26 April 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health First | नाकातून रक्त आल्यास काय करावे उपाय पहा । नक्की वाचा

home remedies when blood comes into nose

मुंबई २९ एप्रिल: नाकाच्या आतल्या बाजूला एक विशिष्ट प्रकारची कातडी असते. या पातळ त्वचेला ‘म्युकोझा असं म्हणतात. म्युकोझा मुळातच नरम असल्यामुळे त्याला थोडासा धक्का लागला किंवा जखम झाली तरी लगेच त्यातून रक्त यायला सुरूवात होऊ शकते. आपलं नाक नेहमी थोडं ओलसर राहावं यासाठी नाकात निसर्गत:च पातळ पदार्थ बनण्याची व्यवस्था असते. उन्हाळ्यात मात्र नाकातला ओलसरपणा कमी होऊन नाक आतून कोरडं पडतं. नाकाच्या आतल्या त्वचेला अगदी लागून रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. त्यामुळे ही त्वचा कोरडी झालेली असताना चुकून नाक- तोंड कुठे आपटलं गेलं किंवा कुणाला नाकात बोट घालून नाक कोरण्याची सवय असेल तर त्यामुळेही रक्तवाहिनी फुटते आणि नाकातून रक्त येतं.

कसे थांबवाल नाकातून वाहणारे रक्त ?
1. नाकातून रक्त वहायला लागल्यानंतर लगेच घाबरून जाऊ नका. तुम्ही उभे असाल तर खाली बसा. नाकपुडीजवळ रूमाल ठेवा. नाक चोळून वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू नका.

2. पहिले बोट आणि अंगठ्याच्या मदतीने नाकाच्या वरचा भाग पकडून ठेवा. बोटाच्या चिमटीत नाक सुमारे 5-7 मिनिटं पकडा. रक्ताचं क्लॉटिंग होण्यासाठी हा वेळ पुरेसा असतो.

3. नाकावर आईस पॅक लावा. यामुळे रक्त थांबायला मदत होते. काही वेळेस डॉक्टर नेसेल पॅकचाही सल्ला देतात. ज्याचा वापर थेट नाकात केला जातो.

4.प्रथमोपचार करताना पाठीवर झोपा. यामुळे नाकाजवळ असलेला दाब पुन्हा संतुलित होण्यास मदत होते. झोपताना डोकं, पाय सरळ रेषेतच ठेवा.

प्रथमोपचार केल्यानेही रक्त थांबत नसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

News English Summary: The inside of the nose has a specific type of skin. This thin skin is called the mucosa. Because the mucosa is basically soft, even if it is slightly hit or injured, it can start to bleed immediately. Therefore, if the skin is dry, where the nose-mouth accidentally hit, or if someone has a habit of scratching the nose with a finger in the nose, then the blood vessels rupture and blood comes from the nose.

News English Title: Home remedies for nose when blood comes news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x