19 April 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

पालकांसाठी केंद्राचा सल्ला | तुमच्या मुलांना कोरोनाची लागण झाल्यास नेमकं काय कराल? - सविस्तर

India corona pandemic

नवी दिल्ली, १ मे | देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार झपाट्यानं होत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर भारतात लहान मुलांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. मोठ्या संख्येने लहान मुलं संक्रमित होत आहेत. प्रत्येक दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या होत आहे. त्यातच लहान मुलांमध्ये कोरोना पसरत असल्याने चिंता वाढली आहे. यामुळेच कोरोना काळात आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लहान मुलांमधील कोरोना प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रालयाने 2 डॉक्युमेंट जारी केले आहेत. एक म्हणजे मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याबाबतच्या नव्या गाइडलाइन्स आणि पीडिएट्रिक एज ग्रुप म्हणजे लहान मुलांच्या उपचारासंबंधी प्रोटोकॉल;

सौम्य संसर्ग असल्यास काय कराल?
गळ्यात खवखव, घसा दुखणे अशी लक्षणं असतील पण शासोच्छवासाला कोणताही त्रास होत नसेल. म्हणजेच माईल्ड इन्फेक्शन असेल तर, लहान मुलांना होम आयसोलेशन मध्ये ठेवा. जास्तीत जास्त तरल पदार्थ द्या. त्यामुळे शरीर हायड्रेट रहायला मदत होईल. हलका ताप येत असेल तर, 10 ते 15 mg पॅरासिटामोल द्या. मात्र काही गंभीर लक्षणं दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा.

मध्यम संसर्ग असल्यास काय कराल?
ऑक्सिजन लेव्हल कमी असलेले मात्र, न्युमोनियाची लक्षण नसलेल्या मुलांना या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. मध्यम लक्षण असलेल्या मुलांना कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करावं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी मुलांना पातळ पदार्थ देत रहावेत. ताप आल्यास पॅरासिटामोल आणि बॅक्टेरियल इनफेक्शन असल्यास अमोक्सिसिलिनसाठी दिलं जाऊ शकतं. शरीरात ऑक्सिजन 94% पेक्षा कमी असेल तर मुलाला ऑक्सिजन द्यावा.

गंभीर संसर्ग असल्यास काय कराल?
अत्यंत गंभीर इन्फेक्शन असेल तर मुलांमध्ये न्युमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, मल्टी ऑर्गन डिसइन्फेक्शन सिंड्रोम आणि सेप्टिक शॉक असे गंभीर लक्षण असतील तर अशा मुलांना तात्काळ आयसीयूत किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कॅटेगरीतल्या मुलांच कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर, रीनल फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स रे करण्याचा सल्ला दिला आहे.

काही लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संक्रमणानंतरही कोणतीच लक्षण दिसत नाहीत. अशा मुलांवर उपचारासंबंधी काही सांगण्यात नाही आलं आहे. पण त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

News English Summary: The second wave of corona is spreading rapidly in the country. The second wave of corona, on the other hand, has taken children in India by storm. A large number of children are being infected. More than 3 lakh patients are being admitted every day. Concerns have also been raised about the spread of corona in young children.

News English Title: Corona Pandemic has now impacted on children too in India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x