18 April 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस? Senco Gold Share Price | सोनं विसरा! या सोन्याच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 3 दिवसात 30% परतावा दिला, फायदा घ्या IRFC Share Price | IRFC शेअर्स मोठी उसळी घेणार, अल्पावधीत करणार मालामाल, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट Guru Rashi Parivartan | गुरु राशी परिवर्तन 'या' 3 राशींसाठी वरदान ठरणार, तुमची नशीबवान राशी आहे यामध्ये?
x

अविश्वास जिंकणार? की मोदींना विरोधकांमध्ये फूट पाडण्याची संधी? आजच निकाल

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमने थेट केंद्रातील सत्तेतून आणि एनडीए’मधून सुद्धा बाहेर पडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आणि त्यांनी थेट मोदी सरकारविरुद्ध विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्नं केला. त्यामुळे आज केंद्र सरकारला अविश्वास ठरावाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

विरोधकांनी मोदीसरकार विरुद्ध अविश्वास ठरावाला आणला असला तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अर्थात एनडीए’चा निर्णय विजय जवळजवळ निश्चित मनाला जात आहे. त्यामुळे या ठराव मोदी सरकारपेक्षा विरोधकांची एकी किती आहे हेच निश्चित करणारा ठरेल असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. या ठरावामुळे एनडीए आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीची ताकद पाहता येणार आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. भाजप सध्याच्या संख्याबळापेक्षा स्वतःची ताकद अजून वाढवून विरोधकांच्या एकीला धक्का देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे. सभागृहात भाजपचे संख्याबळ हे ३१२ इतके असून विरोधकांकडे ते १५३ च्या घरात आहे आणि त्यामुळे विरोधक या विजयापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव सुमारे २०० मतांच्या दणदणीत फरकाने फेटाळला जाऊ शकतो.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x