28 March 2024 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर?
x

Health First | पाहूया गुलकंद आरोग्यास किती लाभदायी आहे

benefits of Gulkand

मुंबई ३ मे : गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’ चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार डोकं वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी आणि तृष्णाशामक गुलकंदच घ्या. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो.

गुलकंद सेवनाचे अनेक फायदे होतात.

अल्सर आणि सूज :
गुलकंदाचे सेवन केल्याने पित्त प्रकोप होत नाही. पोटातील उष्णता कमी करण्याचे काम गुलकंद करतो. त्याशिवाय आतड्याचा अल्सर तसेच सूज यावर उपचार करून त्वरित आराम मिळतो.
गुलकंदामुळे यकृताची ताकद वाढते. तसेच भूक आणि पचन सुधारण्यासही मदत होते.

त्वचेसाठी उपयुक्त :
त्वचेशी निगडित समस्यांमध्ये गुलकंदाचे सेवन केल्याचा फायदा होतो. त्वचेशी निगडित समस्या जसे डाग दूर होण्यास मदत होते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे ब्लॅकहेड्स, पिपल्सच्या समस्या दूर होतात.चेहर्‍याची सूज आणि डोळे लाल होणे कमी होते. तोंड येण्यावरही त्याचा ङ्खायदा होतो.

मासिक पाळीमध्ये प्रभावी :
ज्या स्त्रियांना पाळीच्या काळात अतिरक्तस्त्राव होतो तसेच ल्युकोरिया सारख्या समस्या उद्‌भवतात त्यावर गुलकंद उपयु्क्त आहे.

गुलकंद सेवनाचे इतर फायदे:

  • गुलकंदाच्या सेवनाने शरीर ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो. उन्हामुळे येणारा थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते. शरीराला ऊर्जा देणारे हे टॉनिक आहे.
  • उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खा.
  • गरोदर महिलांसाठी याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुलकंद खाण्याने फायदा होतो.

गुलकंदाचे सेवन कसे करावे :
गुलकंदाचे फायदे पाहिले तर दिवसातून 2 वेळा एक चमचा गुलकंद सेवन करायचे मग ते लस्सी, फळांचा रस, मिल्कशेक, आईस्क्रीम, गुलाब चहा या कोणत्याही प्रकारे करू शकतो.

News English Summary: As delicate and elegant as the rose flower is, it also has health benefits. ‘Gulkand’ made from sugar and rose petals is delicious and healthy. Gulkand is also used in Ayurveda in many medicines. Sugarcane is rich in vitamins C, E and B. Its consumption keeps the body cool and relieves the discomfort caused by summe.

News English Title:Eating  Gulkand is beneficiary to our health news update article

 

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x