29 March 2024 6:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

अधिक पैसे भरा अन्यथा रुग्णाची बॉडी देणार नाही असा दम भरणाऱ्या इस्पितळाचा मनसेने माज उतरवला आणि...

Tulsi Joshi Palghar

नालासोपारा, ०४ मे | कोरोना आपत्तीने सध्या देशातील एकूण आरोग्य व्यस्थेची दुरावस्था समोर आणली आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांना औषधं, ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा असताना दुसऱ्या बाजूला इस्पितळांचा मानसिक आणि आर्थिक छळ देखील सहन करावा लागत आहे. तसाच भयानक आणि लाजिरवाणा प्रकार काल रात्री नालासोपाऱ्यात एका इस्पितळात घडला.

बेहरा कुटुंबातील एक सदस्य मागील १६ दिवस नालासोपाऱ्यातील इस्पितळात उपचार घेत होते. मात्र काल त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोगर कोसळला होता. मात्र त्यातही एक लाजयास्पद असा प्रकार इस्पितळाकडून घडल्याचं पाहायला मिळलं. पुराचारापूर्वी भरलेल्या रकमेवर अजून २ लाख २० हजार भरण्यास इस्पितळाने सांगितले, अन्यथा रुग्णाची बॉडी देणार नाही असं त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. मात्र उपचाराचे पैसे भरले असताना रुग्णाचं मृत शरीर देण्यासाठी देखील इस्पितळाने कुटुंबियांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर मित्र परिवारातील लोकांच्या सल्ल्यानंतर बेहरा कुटुंबातील सदस्यांनी मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांची मदत घेण्याचं ठरवलं आणि समाज माध्यमांवरून माहिती घेत तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तुलसी जोशी यांनी इस्पितळातील संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर धारेवर धरत चांगलेच सुनावले आणि समज देत अशा आपत्तीत कसले धंदे करत आहात असे सुनावले. त्यानंतर संबंधित अधिकारी नरमले आणि पैशाचा रेटा सोडून बेहरा कुटुंबीयांकडे मृत्यू झालेल्या त्यांच्या रुग्णाची बॉडी दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अशा परिस्थितीत देखील त्यांचे आभार मानल्याचं पाहायला मिळलं.

 

News English Summary: The Corona disaster is currently plaguing the country’s overall health system. Corona patients on the one hand have to endure the mental and financial torture of hospitals on the other hand while there is a shortage of medicines, oxygen and vaccines. The same horrible and embarrassing type happened last night at a hospital in Nalasopara.

News English Title: MNS Maharashtra Sainik Tulsi Joshi from Palghar helped family members of covid patient who dead in Nalasopara hospital news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x