20 April 2024 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट
x

मनसेच्या अजून एका पाठपुराव्याला यश, सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त झाल्याने स्त्रीवर्गाला फायदा

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी कौन्सिलने सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतल्याने समस्त स्त्री वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. शालिनी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री मुनगंटीवार आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन या करमुक्तीची लेखी विनंती केली होती, ज्याला आज यश मिळालं आहे.

गरीब वर्गातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स स्वस्त दरात उपलब्ध करून द्यायचा असेल तर सॅनिटरी नॅपकिन्सला करमुक्तीच्या कक्षेत आणणे गरजेचे असल्याचे शालिनी ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आणले होते. त्यासाठी त्यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन लेखी पत्रव्यवहार सुद्धा केला होता. तसेच वैयक्तिक पातळीवर शालिनी ठाकरे यांनी पुढाकार घेऊन अनेक शाळांमध्ये मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे प्रयोग राबविले होते.

भारतासारख्या देशात आजही केवळ १२ टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात आणि ८८ टक्के स्त्रिया जुने सुती कपडे किंवा अन्य साधनांचा वापर करतात. भारतात सुमारे ३५५ दशलक्ष स्त्रिया मासिक पाळी येणाऱ्या आहेत, पण यातल्या ७० टक्के स्त्रियांना सॅनिटरी नॅपकीन्स खरेदी करणं परवडत नाही. ग्रामीण स्त्रिया आजही सुती कापड किंवा झाडाची सुकलेली पानं किंवा इतर साधनांचा वापर करतात. तसेच परदेशी महागडे ब्रँड खूप महाग असल्याने ते गरीब स्त्रीवर्गाला आणि मुलींना परवडणार नसत. त्यामुळे या निर्णयामुळे तमाम स्त्री वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

आज दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत २८ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून अनेक वस्तूंना वगळण्यात आलं असून त्यात सॅनिटरी नॅपकिन्सचा समावेश आहे. त्यामुळे समस्त स्त्रीवर्गाला त्याचा फायदा होऊन सॅनिटरी नॅपकिन्स स्वस्तात उपलब्ध होणार आहेत.

हॅशटॅग्स

MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x