17 April 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

Special Recipe | नाश्त्याला उत्तम असे हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसे

Healthy and crispy Mug dosa

मुंबई ५ मे : सकाळच्या नाश्त्यामध्ये तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळले आहात का? मग एकदा हिरव्या मुगाच्या डोशांचा आस्वाद नक्की घ्या. हा डोसा तयार करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे.हा डोसा आरोग्यासाठी पौष्टिक आणि पचनासाठी अतिशय हलका आहे.

साहित्य :
1 वाटी हिरवी मूग डाळ
1 टीस्पून जिरे
1″ आले
आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या
आवश्यकतेनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी

कृती :
१. डोशाचे पीठ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी भिजवलेले हिरवे मूग, आल्याचा तुकडा, एक चमचा जिरे आणि चार ते पाच मिरच्या एकत्र वाटून घ्या. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी मिक्स करा आणि डोशाचे पीठ तयार करून घ्या. हिरवे मूग पाण्यामध्ये काही तासांसाठी किंवा रात्रभर देखील भिजत ठेवू शकता.

२. डोशाचे पीठ एका बाउलमध्ये काढा. या पिठामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करा.

३. गॅसच्या मध्यम आचेवर एक पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर डोसा तयार करून घ्या.

४. डोशाला सोनेरी रंग येईपर्यंत तसंच कुरकुरीत होईपर्यंत शिजू द्यावा.

५. नारळाची चटणी किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत हिरव्या मुगाच्या डोशाचा आस्वाद घ्या.

News English Summary: Tired of eating the same foods for breakfast? Then try the green muga doshas for sure. The recipe for making this dosa is very simple. This dosa is very nutritious for health and very light for digestion.

News English Title: Healthy and crispy Mug dosa news update article

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x