18 April 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
x

नवे नियम | ओळखपत्र, कोरोना रिपोर्ट नसला तरी कोविड संशयित रुग्णांना अ‍ॅडमिट होता येणार

India corona pandemic

मुंबई, ०८ मे | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही. संशयित व्यक्तिलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी, डीसीएससी आणि डीएससीमध्ये भरती करण्यात येणार आहे.

रुग्णांला दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. त्याचबरोबर रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी करोना संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी संशयित रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावं. एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

काय आहेत नियम

  • रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या रिपोर्टची गरज नाही
  • संशयित व्यक्तीही रुग्णालयात अ‍ॅडमिट होऊ शकतो
  • कोणत्याही शहरातील कोणत्याही रुग्णाला ओळखपत्रं नाही म्हणून रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यापासून रोखता येणार नाही
  • कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन आणि औषधे देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, मग तो कुठल्याही शहरात राहणारा असो
  • रुग्णाची लक्षणे आणि गरज पाहूनच रुग्णालयात दाखल केलं जाईल
  • रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्याची गरज नसतानाही रुग्णांनी बेड अडवून ठेवले तर नाही ना, हे पाहणं बंधनकारक आहे
  • येत्या तीन दिवसात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत

 

News English Summary: A suspect case (of COVID-19) shall be admitted to the suspect ward of CCC, DCHC or DHC as the case may be. No patient will be refused services on any count. This includes medications such as oxygen or essential drugs even if the patient belongs to a different city said union Health Ministry news updates.

News English Title: A suspect COVID 19 shall be admitted to the suspect ward without corona report said union health ministry news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x