28 March 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Health First | जाणून घ्या अर्धशिशीवर ( मायग्रेन )आहेत काही घरगुती उपचार

home remedies for migraine

मुंबई ८ मे : डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन त्यालाच आपण अर्धी डोकेदुखी म्हणतो. अमेरिकेतील प्रत्येकी पाच महिलांपैकी एका महिलेला त्रास होतो तर यूकेमध्ये चार पैकी एक महिलेला मायग्रेनने त्रस्त केले आहे. भारतामध्ये ह्या मायग्रेनचा त्रास बर्‍याच लोकांमध्ये आढळतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असते. हा आजार साधारणत: 20 ते 45 वयोगटातल्या लोकांना जास्त प्रमाणात होतो. 50 वर्षांवरील वयाच्या लोकांना हा होत नाही. हा त्रास उच्चभ्रू लोकांना जास्त होतो. फिल्डमध्ये 25 टक्के मुलांमध्ये हा त्रास असतो. असा जीवघेणा हा त्रास आहे. हा आजार ठीक करण्यास त्रासदायक असून ही एक जागतिक समस्या आहे. परंतु ह्यावर निश्चित उपचार उपलब्ध नाही. आयुर्वेदाने ह्याचा उपचार शक्य आहे.

कारणे हेतू: आतापर्यंत जे काही ह्या आजारावर संशोधन झाले आहे, त्यानुसार ह्या आजाराचे निश्चित कारण किंवा तपासणी सांगता येत नाही. परंतु खाली दिलेली काही कारणे ह्या आजाराला उत्पन्न करतात.

1. अवेळी जेवण भूक नसताना जेवणे व उपवास.
2. अनियमित झोप, अति झोप, कमी झोप.
3. अति प्रवास.
4. जेवण करताना जास्त पाणी पिणे
5. spicy जेवण नियमित घेणे.
6. pain killers चा अधिक वापर (रुग्ण स्वत: मनाने करतात)
7. कुटुंबनियोजनार्थी वापरण्यात येणारी औषधी, हार्मोन्स थेरपी इत्यादी.
8. hereditary
9. सूर्यप्रकाशात जास्त फिरणे.
10. चिंता, कामाची घाई.
11. पचायला जड पदार्थ खाणे
12. मनात नेहमी छोटया गोष्टींचा विचार करत राहण्याची सवय.

मायग्रेनसाठी (डोकेदुखी) घरगुती उपाय

  • ताज्या आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्निशियम मोठ्या प्रमाणावर असते. हे रसायन अर्धशिशीसारखा विकार चुटकीसरशी घालवतात. गव्हामध्येही मॅग्निशियम असते. हा विकार झालेल्यांनी आहारात जास्तीतजास्त गव्हाचा वापर करायला हवा.
  • जेवणात मासे असणे चांगले. कारण त्यात ओमेगा-३ हे फॅटी अॅसिड आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अर्धशिशीमुळे होणारा त्रास मासे खाण्यामुळे बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
  • साय नसलेले दूध प्यायल्यानेही किंवा दुधापासून बनविलेले कोणतेही पदार्थ खाल्ल्याने या विकारावर चांगला फायदा होतो. दुधात व्हिटॅमिन-बी भरपूर असते. त्याला रायबोफ्लेविन असंही म्हटलं जातं. शरीरातील पेशींना ते ऊर्जा देण्याचं काम करतात. पेशींना ऊर्जा मिळाली नाही की अर्धशिशी होऊ शकते.
  • अर्धशिशी सुरू झाली की लगेच गरगमागरम कॉफी प्यायलाच हवी. कॉफीमधील रसायनामुळे हा विकार नाहीसा होतो.
  • बाजरीमध्ये फायबर, अॅन्टीऑक्सिडंट आणि मिनरल असतात. त्यामुळे या विकारावर बाजरी आहारात असणेही गरजेचे आहे.
  • आलं खाल्ल्यामुळेही अर्धशिशी पळून जाते. आहारात आल्याचा वापर करायलाच हवा.
  • धन्याचे पाणी प्याल्यानेही मायग्रेनचा त्रास कमी होतो.
  • ध्यानधारणा, दीर्घश्वसन केल्यानेही ह्यात आराम मिळतो.
  • रात्री जागरण टाळावे.झोपताना टी. व्ही. बघू नये, शिवाय ह्या रुग्णांनी नेहमी अंधारमय खोलीतच झोपावे.
  • सकाळी 4 वाजता उठून जिलेबी 2 वेडे व दूध पिऊन झोप घ्यावी. ह्याने डोकेदुखी बंद होते.
  • खोबर्‍याच्या तेलाने हळूवार मालिश करावी.
  • पत्ताकोबीच्या पानाने मानेला व डोक्याला बांधून ठेवल्यानेही हा त्रास कमी होतो.

News English Summary: Headaches come in different forms. Lifestyle problems are migraines, which we call half-headaches. One in five women in the United States suffers from migraines, while one in four women in the UK suffer from migraines. Migraine is a common problem in India.

News English Title: Do home remedies for migraine news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x