24 April 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार। नक्की वाचा

home remedies for bad smell of feet

मुंबई ९ मे : उन्हात फिरताना चेहऱ्यावर, मानेवर, काखेत मध्ये घाम येतो. तो चटकन दिसतो. पण पावलांना येणारा घाम, तो दिसत नसल्यामुळे त्याचा त्रास फक्त त्या व्यक्तीलाच होतो. पावलांना आलेल्या घामामुळे दुर्गंधी निर्माण होते. तसंच ओले शूज आणि घामटलेले सॉक्स या समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले.

कारणे :
तुमच्या पावलांना अतिरिक्त घाम येतो का?
पावलांना अतिरिक्त घाम येणे ही समस्या अनुवंशिक आहे. याला hyperhysrosis असे म्हणतात. उष्ण वातावरण, भीती, चिंता, ताप, आजारपण किंवा इन्फेकशन यामुळे घाम येतो. तसंच सॉक्ससाठी वापरले जाणारे फॅब्रिक यामुळे देखील अति प्रमाणात उष्णता निर्माण होते व त्यामुळे घाम येतो.

उपाय :

१. पायाला येणारा घाम आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी tea soaks वापरून बघा. tea soaks पाण्यात घालून त्यात पाय बुडवून बसा. चहा मध्ये असलेल्या tannins यामुळे घामग्रंथी तात्पुरत्या आकुंचित होतात आणि त्यामुळे कमी घाम येतो.

२. त्वचा कोरडी करण्यासाठी आणि दुर्गंधी आटोक्यात राहण्यासाठी तुम्ही counter powder व sprays चा वापर करू शकता. तसंच काखेजवळील घाम कमी करण्यासाठी वापरले जाणारे antiperspirants तुम्ही वापरू शकता.

३. कॉटनचे सॉक्स वापरणे अधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे पावलांला मोकळा श्वास घेता येईल व त्वचेतील ओलावा दूर होतो.

४. बोटं झाकून जाणारे शूज वापरल्याने विशेषतः उन्हाळ्यात अधिक घाम येतो. शक्य असल्यास बोटं मोकळी राहतील असे शूज वापरा. लेदर आणि कॅनव्हासचे शूज वापरल्यास घाम दूर राहतो. तसंच सिन्थेटिक मटेरियलच्या सॉक्स ऐवजी ते सॉक्स वापरणे अधिक योग्य ठरेल.

काही घरगुती पदार्थांचे उपाय :

आल्याचा रस :
जर तुमच्या पायांना घाम य़ेत असेल तर आल्याचा रस पायांना चोळा आणि त्यानंतर गरम पाण्याने पाय स्वच्छ धुवून टाका. असं केल्याने पायांना येणारी दुर्गंधी नाहीशी होईल.

लव्हेंडर ऑईल :
लव्हेंडर ऑईल हे फक्त चांगला सुंगधच देत नाहीत तर बॅक्टेरिया मारण्याचंही काम करतात. हे तेल वापरल्यास पायांची दुर्गंधी नाहिशी होते. थोड्याशा कोमट पाण्यामध्ये काही थेंब लव्हेंडर ऑईलचे थेब टाका. त्यानंतर या पाण्यामध्ये काही वेळ पाय बुडवून ठेवा. दिवसातून असं दोनदा केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

बेकिंग सोडा :
पायांना येणारी दुर्गंधी घालविण्यासाठी बेकिंग सोडा हा अतिशय उपयुक्त ठरतो. बेकिंग सोडा हा घामाची pH लेव्हल सामान्य ठेवतो आणि बॅक्टेरिया नियंत्रित करतो. थोड्या कोमट पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि १५ ते २० मिनिटं पाय पाण्यात बुडवून ठेवा. असं काही आठवडे केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

पायांची निगा राखा :
सगळ्यात शेवटी पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शूज घालण्यापूर्वी आपले पाय स्वच्छ आहेत की नाही हे तपासून घ्या. कारण की बऱ्याचदा घाणेरड्या पायांनी शूज घातल्यास पायांना जास्त दुर्गंधी सुटते.

पावलांना येणारा अतिरिक्त घाम कमी करण्यासाठी दुसरी कोणती ट्रीटमेंट आहे का ?
Mirady या प्रक्रियेमुळे काही काळाने पावलांना-हातांना घाम येण्याचे प्रमाण कमी होते. तसंच पावलांना बूटॉक्स केल्याने तात्पुरती म्हणजे तीन महिन्यांसाठी घाम निर्मिती स्थगित होते.

News English Summary: Sweating on the face, neck, armpits while walking in the sun. It looks easy. But the sweat on his feet, because he can’t see it, only bothers that person. Sweat on the feet causes bad breath. Also, wet shoes and sweaty socks are some of the solutions.

News English Title: Do home remedies for bad smell of feet new update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x