24 April 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

सकाळचा नाश्ता आहे सर्वात महत्वाचा आणि तो न केल्याने होणारे आरोग्यास होणारे तोटे जाणून घ्या

importance of having breakfast

दिवसभराच्या आहाराच्या तुलनेत सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. ब्रेकफास्ट चुकवल्याने याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अनेक अभ्यासादरम्यान ही बाब समोर आली आहे. काहीजण सकाळी ब्रेकफास्ट करत नाही मात्र, यामुळे आरोग्यास खूप तोटे होतात. यामुळे अनेक आजारही होऊ शकतात.

सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. असं सांगितलं जात की, सकाळचा नाश्ता हा नेहमी राजासारखा करावा. यामागचे कारण म्हणजे झोपून उठल्यानंतर म्हणजेच साधारण सात ते आठ तास आपल्या पोटात कोणत्याही प्रकारचे अन्न खाल्ले जात नाही. त्यामुळे सात ते आठ तासांच्या कालावधीनंतर पोटाला अन्नाची गरज भासते. ही गरज नाश्त्यातून पूर्ण केली गेली पाहिजे.

आरोग्यदायी आणि सुदृढ शरीरासाठी हा ब्रेकफास्ट म्हणजे जणू एका अविरत चालणाऱ्य़ा इंजिनमध्ये टाकलं जाणारं तितकंच चांगलं इंधन. ज्यामुळं हे शरीररुपी इंजिन अगदी सुरळीत चालतं. ब्रेकफास्ट करण्याचे तसे अनेक फायदे आहेत. त्यातही काही पोषक पदार्थांचं सेवन केल्यास त्यामाध्यमातून शरीरासाठीची आवश्यक उर्जा सात्तत्यानं पुरवली जाते. धान्य, पोहे, इडली, दलिया, अंड अशा पदार्थांचा समावेश असल्यामुळं हा परिपूर्ण आहार ठरतो. त्यामुळं ब्रेकफास्ट कधीही टाळू नका असाच सल्ला कायम देण्यात येतो. ब्रेकफास्ट टाळल्यामुळं त्याचे थेट परिमाम शरीरावर होतात. चला जाणून घेऊया, काय आहेत ते परिणाम…

ब्रेकफास्ट न केल्याने होतात हे तोटे

डायबिटीज : ब्रेकफास्ट न केल्याने डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. हॉवर्ड युनिर्व्हसिटीच्या एका स्टडी रिपोर्टनुसार, ज्या महिला ब्रेकफास्ट करत नाही त्यांना टाईप-२ डायबिटीज होण्याचा धोका २० टक्के अधिक असतो.

वजन वाढणे – सकाळचा ब्रेकफास्ट टाळल्याने वजन कमी होत असेल असा तुमचा समज असेल तर तुम्ही साफ चुकताय. अनेक संशोधनादरम्यान ही बाब समोर आली आहे की, दररोज ब्रेकफास्ट केल्याने वजन संतुलित राहते. याशिवाय जे लोक ब्रेकफास्ट करणे टाळतात ते लंच आणि डिनरमध्ये अधिक खातात. याचा परिणाम वजन वाढीवर होतो.

पचनक्रियेवर परिणाम – सकाळाच नाश्ता न केल्यास शरीरातील पचनक्रियेवर परिणाम होतो. दिवसभर कोणत्याही प्रकारचा आहार टाळल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो. दीर्घकाळ काही न खाल्ल्यास शरीरातून कॅलरी बर्न करण्याची क्षमता कमी होते.

भूक लागल्याने राग येणे – अधिक काळ उपाशी राहिल्याने अनेकांना राग येतो. एका अभ्यासातून ही बाब समोर आलीये की, जे पुरुष दररोज ब्रेकफास्ट करतात त्यांचा मूड ब्रेकफास्ट न करणाऱ्यांच्या तुलनेत चांगला असतो. याशिवाय ब्रेकफास्ट न केल्याने ब्लड शुगरचा स्तर कमी होतो. चक्कर आण डोकेदुखीही सतावते.

मुखदुर्गंधी – ब्रेकफास्ट न केल्याने केवळ शरीरावरच परिणाम होत नाही यामुळे तुमची सोशल लाईफही प्रभावित होते. ब्रेकफास्ट न केल्याने तोंडात लाळ बनण्याचे प्रमाण कमी होते यामुळे जिभेवरील बॅक्टेरिया दूर होत नाही आणि मुखदुर्गंधीचा त्रास सतावतो.

News English Summary: Breakfast is a very important meal – it can either make or break your day. Missing breakfast has a big impact on health. This has come to the fore during several studies. Some people do not eat breakfast in the morning, however, it is very harmful to health. It can also cause many diseases.

News English Title: Skipping breakfast causes many diseases news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x