28 March 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

VIDEO उत्तर प्रदेश | मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेत जमले 20 हजार लोकं | प्रचंड गर्दीसमोर पोलिसही हतबदल

India corona pandemic

लखनऊ, ११ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी मागील पंधरा दिवसातील सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 26 एप्रिलला 3.19 लाख रुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारी 3,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एका बाजूला देशात चित्र भीषण असताना, दुसऱ्याबाजूला उत्तर प्रदेशातून एकावर एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात जिला-ए-काजी हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांच्या अंत्ययात्रेत 15-20 हजार लोकांची गर्दी जमल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी सर्वांनाच कोरोना नियमांचा विसर पडला. या गर्दीमध्ये अनेकांनी तोंडावर मास्कदेखील लावला नव्हता. गर्दीतील प्रत्येकाला आपल्या धर्मगुरुला खांदा द्यायचा होता. या संपूर्ण प्रकारादरम्यान पोलिसही हतबल दिसले. सोमवारी रात्री अज्ञातांविरोधात एपआयआर दाखल करण्यात आली आहे.

मौलवी टोलामध्ये मुस्लिम धर्मगुरु हजरत शेख अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल कादरी बदायूंनी यांचे रविवारी निधन झाले. त्यांचा मुस्लिमांसह हिंदूदेखील आदर करायचे. त्यांनी अनेक प्रकरणात सरकारला पाठींबा दिला होता. मग नागरिकत्व कायदा असो किंवा कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करणे असो. ते स्वतः लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगायचे.

दुपारी त्यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने जमले. पाहता-पाहता त्यांच्या अंत्ययात्रेत 15-20 हजार लोक जमा झाले. यावेळी धर्मगुरुंच्या अनुयायांमध्ये कोरोनाची भीती दिसत नव्हती. कुणीच कोरोना नियमांचे पालन केले नाही. या एवढ्या मोठ्या गर्दीसमोर पोलिसही हतबदल दिसू लागले.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात पसरत असलेल्या स्ट्रेनला जागतिक स्तरावर चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, भारतात सर्वात पहिले ऑक्टोबरमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट B.1.617 जास्त संक्रामक आहे आणि हा सहज पसरू शकतो.

 

News English Summary: In the Badaun district of Uttar Pradesh, a crowd of 15-20 thousand people has gathered at the funeral procession of District-A-Qazi Hazrat Abdul Hameed Mohammad Salimul Qadri. This time everyone forgot the Corona rules.

News English Title: Twenty thousand people gathered for the funeral of a Muslim cleric in  Uttar Pradesh during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x