25 April 2024 11:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक

benefits of Broccoli

मुंबई १२ मे : ब्रोकोली ही भाजी इतकी स्वादिष्ट भाजी इतकी पौष्टिक आहे जी एखाद्या भाजीत क्वचितच आढळते.ब्रोकोली मध्ये कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आयरन व्हिटॅमिन ए सी आणि अनेक पोषक घटक आढळतात. आपण ह्याला सॅलड सूप किंवा भाजीच्या रूपात वापरू शकता. या मध्ये व्हिटॅमिन सी असते जे प्रतिकारक शक्तीला वाढवते. हे खाल्ल्याने कर्करोग होण्याची भीती कमी होते. या मध्ये व्हिटॅमिन के, जिंक, फास्फोरस, आणि कॅल्शियम दात आणि हाडांना बळकट करतात. या मध्ये केरेटेनॉइड्स ल्युटीन आढळते जे हृदयाच्या रक्तवाहिनीना निरोगी ठेवते.

ब्रोकोलीचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

कर्करोग प्रतिबंधित करते
ब्रोकोलीमध्ये कॅन्सरपासून लढण्यासाठी आणि रोगप्रतिकारक गुणधर्मांचा साठा आहे. ब्रोकोलीमध्ये इस्ट्रोजेन-नष्ट करणारे गुणधर्म आहेत, जे इस्ट्रोजेन कर्करोग निर्मिती करतो.स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य:
ब्रोकोली हृदय निरोगी करते. त्यात फायबर, फॅटी अॅसिडस आणि जीवनसत्त्वे असतात जे शरीरात रक्तदाब नियंत्रित करतात. तसंच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. ब्रोकोली रक्तवाहिन्यांच्या नुकसानापासून संरक्षण देखील करते.

एलर्जी आणि सूज कमी करण्यासाठी मदतशीर:
शरीरातील एलर्जी आणि सूज कमी करण्यासाठी ब्रोकोली देखील खूप उपयुक्त आहे. ब्रोकोलीमध्ये भरपूर ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. ज्यांना अँटी-इंफ्लेमेटरी म्हणून ओळखले जाते. हे संधिवातापासून बचाव करते. कारण यात सल्फोराफेन एंजाइम असतं. जे ज्वाइंट्स अवरोधित करतं. जे ज्वाइंट डिस्ट्रक्शनचं कारण बनतं ज्यामुळे हाड्यांना सूजन येते.

अॅन्टिऑक्सिडेंट पॉवरहाऊस:
ब्रोकोली अॅन्टिऑक्सिडेंटचे एक पॉवरहाउस आहे आणि म्हणूनच रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे चांगले आहे. ब्रोकोलीमध्ये फ्लेव्होनॉइड्स देखील असतात जे व्हिटॅमिन सीची कार्यक्षम रिसायकल करण्यास मदत करतात.

हाडांची मजबूती:
ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असते, त्यामुळे ते हाडे मजबूत करते आणि ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव करते. मुले, वृद्ध आणि स्तनपान देणाऱ्या मातांनी हे खाणं आवश्यक आहे. कॅल्शियमसह ब्रोकोली देखील मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस सारख्या इतर पोषक द्रव्यांसह भरलेले आहे.

डिटॉक्सिफिकेशन:
ब्रोकोलीमध्ये फायबर समृद्ध आहे, म्हणून ते शरीरात पाचक प्रणालीद्वारे डीटॉक्स करते. यात शरीरात डिटॉक्स प्रक्रियेस मदत करणारे बरेच फायटोन्यूट्रिएंट्स आहेत.

प्रदूषणापासून बचाव करते:
ब्रोकोली शरीरातून धोकादायक वायू प्रदूषक सहजपणे काढून टाकते. ब्रोकोलीमध्ये आढळणारा वनस्पती प्लांट कंपाऊंड सल्फोराफेन हा कर्करोगाचा प्रतिबंधक आहे आणि या सजीवांच्या शरीरातून प्रदूषक काढून टाकण्यास मदत करते.

News English Summary: Broccoli is such a delicious vegetable that it is rarely found in any vegetable. Broccoli contains calcium, carbohydrates, iron, vitamin A, C and many other nutrients. You can use it as a salad soup or as a vegetable. It contains Vitamin C which boosts the immune system. Eating it reduces the risk of cancer.

News English Title: Eating Broccoli is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x