29 March 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Tauktae cyclone

मुंबई, १५ मे : | दक्षिण अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र कमी दाबाचे बनले असून १६ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून गुजरात-कच्छच्या दिशेने जाईल, असा अंदाज शुक्रवारी आयएमडीने वर्तवला आहे. परिणामी राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर किनारा या भागात १५ मे ते १७ मे या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने या काळासाठी राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट तर १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

आयएमडीच्या अहवालानुसार, दक्षिण अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन त्याचे १५ ते १६ मे या काळात चक्रीवादळात रूपांतर होईल. तर १७ मे रोजी वाऱ्याचा वेग वाढून हे चक्रीवादळ विध्वंसक होईल आणि १८ मे रोजी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १५० ते १६० किमी राहील. प्रसंगी तो ताशी १७५ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परिणामी हे चक्रीवादळ दि. १५ ते १६ मे या काळात महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून मार्गक्रमण करणार असून त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

‘तौत्के’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यात ऑरेंज झोन जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा रोख गुजरातच्या दिशेने असला तरीही हे वादळ कोकण किनारपट्टी भागातून पुढे सरकरणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. रत्नागिरी आमि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 15 व 16 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी 15 आणि 16 मे या काळात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

News English Summary: The low pressure area in the South Arabian Sea has now turned into a severe low pressure area and is expected to turn into a cyclone on May 16, according to the Indian Meteorological Department (IMD). The cyclone is expected to move from the coast of Maharashtra towards Gujarat-Kutch, the IMD said on Friday.

News English Title: Tauktae cyclone is expected to move from the coast of Maharashtra towards Gujarat Kutch the IMD said news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x