18 April 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर्स मोठी उसळी घेणार, अल्पावधीत करणार मालामाल, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट Guru Rashi Parivartan | गुरु राशी परिवर्तन 'या' 3 राशींसाठी वरदान ठरणार, तुमची नशीबवान राशी आहे यामध्ये? Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
x

महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली

India corona pandemic

मुंबई, १५ मे | देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली. तथापि, मृत्यूचे आकडे वाढतेच आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा ४,०५० मृत्यूंची नोंद झाली. शुक्रवारी महाराष्ट्रातही नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसली.

दरम्यान, कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना लशींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लसखरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्राने त्यास परवानगी दिली नसल्याने निविदा प्रक्रियाच रखडली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी त्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त लशी उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप परदेशी लस खरेदीसाठी राज्याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जागतिक निविदा काढण्याची प्रक्रिया रखडली आहे.’’ जागतिक निविदा काढण्यासाठी महापालिकांना मात्र राज्य सरकारची परवानगी आवश्यक नसल्याचेही पवार यांनी या वेळी स्पष्ट के ले.

 

News English Summary: While the second wave of the Corona epidemic is raging, there is also a shortage of vaccines. Therefore, even though the state government has decided to issue a global tender for the purchase of vaccine, the tender process has stalled as the Center has not allowed it.

News English Title: Modi govt has not yet gave approval for Maharashtra Global tender of vaccine purchase news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x