20 April 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये
x

प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात

CM Mamata Banerjee

नवी दिल्ली, १७ मे | प. बंगालमधील निवडणूक संपून पुन्हा टीएमसीची बहुमताने सत्ता आली असून भाजपाची सर्व स्वप्नं भंगल्याने केंद्रीय गृह मंत्रालय पुन्हा जागं झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे भाजपचे नेते जसे सत्ता नसलेल्या राज्यात संबंधित राज्यपालांना भेटतात, त्याप्रमाणे सीबीआयने पश्चिम बंगालच्या राज्य सरकार ऐवजी राज्यपालांमार्फत धाड टाकण्यासाठी मान्यता घेतल्याचं वृत्त आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारद स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती. विशेष म्हणजे या धाड सत्रानंतर स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारची परवानगी न घेता कारवाई कशी काय केली असा जाब त्यांनी विचारला.

त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं सरकार येताच सीबीआयने पुन्हा एकदा नारदा घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

त्यानंतर सीबीआयची टीम सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना घेऊनही सीबीआय कार्यालयात आली. या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्या प्रकरणी काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या चारही नेत्यांनी सीबीआयने आपल्याला अटक केल्याचा दावा केला आहे. तर सीबीआयने आम्ही या नेत्यांना अटक केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: West Bengal Governor Jagdeep Dhankhad had allowed the case to be filed against Firhad Hakeem, Subrata Mukherjee, Madan Mitra and Sovan Chatterjee in the Narad sting case. Chief Minister Mamata Banerjee herself has entered the CBI office after the raid. He asked how the action was taken without the permission of the state government.

News English Title: Chief Minister Mamata Banerjee herself has entered the CBI office after the raid news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x