25 April 2024 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

ते दरवेळी स्वतःचे गुन्हे अशा प्रकारे मिटवतात | खुल्या मैदानात येण्याचं वचन देत TV'वर येऊन रडतात... आसूंजीवी!

Congress leader Atul Londhe Patil

मुंबई, २२ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. आपली लढाई एका अदृश्य आणि धूर्त शत्रूविरोधात आहे. सतत बदलणाऱ्या या शत्रूमुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे. लहान मुलांना वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असं सांगताना मोदी भावूक झाले होते.

यावेळी त्यांनी ब्लॅक फंगसपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. या आजारापासून सावध राहून अॅक्शन घ्यायची आहे. संकटाच्या काळात काहीवेळा लोकांची नाराजीही ओढवते. मात्र, तरीही आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यांचं दु:ख कमी करायचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला होता.

दरम्यान, मोदींच्या या रडण्याची सर्वच थरातून खिल्ली उडवली गेल्याच पाहायला मिळतंय. आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी त्यांचं 17 एप्रिलचं ट्विट शेअर करत मोदींवर टीका केली आहे. मी 17 एप्रिल रोजी जे बोललो होतो, ते 21 मे रोजी खरं ठरलं.

तत्पूर्वी देखील मोदींनी अनेकदा असे भावनिक करणारे हुंदके दिल्याचं सर्वश्रुत आहे. नोटबंदीच्या वेळी देखील विषय अंगलट येण्याचं दिसताच त्यांनी देशाकडून केवळ मला ५० दिवस द्या असं म्हणताना हुंदका दिला होता. कारण त्यांना माहित होत तोपर्यंत वातावरण काहीसं निवळलेलं असेल. याच विषयाचा अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी मोदींचं नाव न घेता टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे कि, “ते दरवेळी स्वतःचे गुन्हे अशा प्रकारे मिटवतात | खुल्या मैदानात येण्याचं वचन देत TV’वर येऊन रडतात’.

 

News English Summary: PM Narendra Modi crying record congress spokesperson Atul Londhe Patil criticized Narendra Modi news updates

News English Title: PM Narendra Modi crying record congress spokesperson Atul Londhe Patil criticized Narendra Modi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x