19 April 2024 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
x

मराठा आरक्षणसाठी आज पुण्यात चक्काजाम

पुणे : मराठा आरक्षणावरून राज्यभर हिंसाचार सुरु झाल्यावर राज्य सरकार खडबडून जाग झालं असलं तरी मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलन आणि चक्काजाम थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आज मराठा आरक्षणसाठी पुण्यात चक्काजाम करण्यात आल्याने अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट जाणवत होता.

या वेळी आंदोलकांनी विविध विषयांना हात घालत त्यांच्या मागण्या प्रसार माध्यमांकडे व्यक्त करताना म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलक करताना दिसत होते.

तसेच डेक्कन जिमखान्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला आंदोलकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर जिजाऊ वंदनेने मोर्चाला प्रारंभ झाला. या आंदोलनादरम्यान औरंगाबाद यथे मृत्यू पावलेल्या काकासाहेब शिंदे यांनाही यावेळी आंदोलकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x