29 March 2024 12:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती

Maratha reservation

कोल्हापूर, ०४ जून | छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे.

संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून आपली भूमिका व्यक्त केली आहे. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.

ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे. कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

News English Summary: MP Sambhaji Chhatrapati has said that the job of Chhatrapati family is not to burn people but to give justice. Some organizations have started agitation on the issue of Maratha reservation. The BJP has supported these agitations. It is against that background that Sambhaji Chhatrapati’s statement has gained importance.

News English Title: MP Sambhajiraje Chhatrapati on Shivrajyabhishek Program At Raigad news updates.

हॅशटॅग्स

#Sambhaji Bhide(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x