24 April 2024 1:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Digital India | आयकर विभागाची नवी वेबसाईट पाहिल्या दिवशीच क्रॅश | सीतारामन इन्फोसिसवर संतापल्या

Minister Nirmala Sitharaman

नवी दिल्ली, ०८ जून | इन्कमटॅक्स विभागाची नवी वेबसाईट मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून आयकर विभागाची नवीन वेबसाईट सोमवारी रात्री लाँच करण्यात आली. मात्र, करदात्यांनी ही वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो ट्विटरवर टाकल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरून इन्फोसिस आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना चांगलेच झापले आहे.

ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 8.45 मिनिटांनी लाँच करण्यात आले. या नव्या वेबसाईटवर आयकर विभागाने वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत. यामध्ये तुमचा पॅन नंबर टाकल्यानंतर तुमच्या अकाऊंटला तुमची सारी माहिती आपोआपच लोड होणार आहे. अशा अनेक सुविधा या वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. मात्र, ही वेबसाईटच सुरु होण्यास समस्या येऊ लागल्याने अनेकांनी याचे फोटो समाज माध्यमांवर पोस्ट करत तक्रार केली होती.

यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत चांगलेच सुनावले आहे. त्यांनी अशाप्रकारची असुविधा पुन्हा करदात्यांना होता नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. करदात्यांना चांगली सेवा देणे आपली प्राथमिकता असायला हवी, असे त्या म्हणाल्या.

 

News English Summary: The new Income Tax Department website was launched on Monday night with great fanfare and with the server shut down for six days. However, Finance Minister Nirmala Sitharaman slammed Infosys and co-founder Nandan Nilekani on Twitter for posting a photo of taxpayers crashing the website.

News English Title: Union finance minister Nirmala Sitharaman asks Infosys Nandan Nilekani to fix glitches in new income tax e filing portal news updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x