19 April 2024 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल
x

मनसेच्या दणक्यानंतर 'द शर्ट' कंपनीकडून कामगारांच्या रखडलेल्या १० महिन्यांच्या पगाराचे वाटप सुरु

नवी मुंबई : नवी मुंबई मधील “द शर्ट” नावाच्या कंपनी मध्ये काम करत असलेल्या कामगारांचे पगार मागील दहा महिन्यापासून रखडले होते. त्यात अनेक ठिकाणी दाद मागून सुद्धा कंपनीचे व्यवस्थापक मंडळ कामगारांच्या पोटापाण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते.

संबंधित कामगारांनी मनसेचे ठाणे तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे या विषयी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर अविनाश जाधव यांच्यासहित महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस सचिन गोले , मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, नवी मुंबई मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे, विभाग अध्यक्ष शरद डिगे, लीलाधर घाग, शाखा अध्यक्ष चंद्रकांत डांगे, डॉ. विशाल ढोक, अरुण पवार, प्रफुल्ल फळसमकर, शुभम धुमाळ, अभिजीत कोलेकर, प्रशांत इंगले यांनी थेट नवी मुंबई मधील “द शर्ट” कंपनीवर धडक दिली होती.

त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाबरोबर झालेल्या बैठकीत संबंधित कंपनीने पुढील पंधरा दिवसाच्या आत सर्व कामगारांचे प्रलंबित पगार दिले जातील असं आश्वासन मनसे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला दिल होत. त्यानुसार आज सर्व कामगारांना पगाराचे वाटप सुरु झाले आहे. सर्व कामगारांनी त्याबद्दल मनसेचे आभार मानले आणि अनेक महिन्यांपासून पोटाला चिमटा काढून बसलेल्या सामान्य कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x