25 April 2024 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health First | चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय | नक्की ट्राय करा

Unwanted hair

मुंबई, १२ जून | चेहऱ्यावर नको असलेल्या केसांमुळे आपल्या साैदर्यात बाधा येते. हे केस काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात. परंतु, कधीकधी कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील असे विचार करता की, असा एखादा कोणता मार्ग वापरला तर आपण त्याद्वारे चेहर्‍यांचे अवांछित केस काढून टाकू शकता. आज आम्ही तुम्हाला घरगुती पॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर नको असलेले केस घरच्या घरी काढू शकतात.

तोंडावरचे नको असलेले केस हार्मोनल असंतुलनमुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळे येण्याची शक्यता असते. या केसांमुळे चारचौघात जायचं म्हटलं की टेंशन येतं. संपूर्ण लूक बिघडतो. यावर उपाय म्हणून सतत थ्रेंडिंग आणि वॅक्सिंग करणंही कामाच्या गडबडीमुळे शक्य होत नाही. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पार्लर अनेक महिने बंद होते. त्यामुळे घरोघरच्या महिलांची चांगलीच गैरसोय झाली. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नको असलेले केस काढून टाकण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.

साहित्य:

6 मोठे चमचे साखर
दोन चमचे मध
दोन चमचे लिंबाचा रस
3 चमचे पाणी

अगोदर हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर टॅल्कम पावडर लावा जेणेकरून त्वचेतून तेल निघेल आणि ही पावडर चांगल्या प्रकारे शोषून घेते. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर ज्याठिकाणी नको असलेले केस आहेत. तेथे लावा आणि साधारण 30 मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर चेहरा चोळून घ्या आणि पाण्याने चेहरा धुवा.

तुमच्या चेहऱ्यावर जास्त स्वरुपात केस असल्यास नियमित या पेस्टचा उपयोग करावा. यासह आपण चेहऱ्यावर तांदळाच्या पिठाचा लेप देखील लावू शकता. तांदळाच्या पिठामुळे त्वचेवरील अनावश्यक केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

दोन चमचे गुलाब पाणी
दोन चमचे नारळाचे तेल
दोन चमचे बेसन

वाटीमध्ये नारळाचे तेल व बेसन एकत्रित घेऊन पेस्ट तयार करा. यानंतर एक चमचा गुलाब पाणी मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर अपर लिप्सवर लावा आणि 30 मिनिटांनंतर हळूवार रगडून ही पेस्ट काढावी. सलग सात दिवस हा उपाय केल्यास तुम्हाला आपल्या त्वचेमध्ये फरक जाणवेल. यानंतर कापसाच्या मदतीने आपण त्वचेवर गुलाब पाणी लावू शकता.

महत्वाची टीप : घरगुती उपाय करताना सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

News Title: Try home remedies to remove unwanted hair on face health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x