25 April 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नाही तर पेशवाईला फटका

Nana Patole

अमरावती, १२ जून | राज्यात सध्या अनेक घान सुरु आहेत. अशात प्रत्येक राजकीय पक्षाचा महत्वाचा नेता आपला पक्ष वाढवण्यासाठी दौरे करत आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही विदर्भ दौऱ्यावर आहे. आज (१२ जून) नाना पटोले अमरावतीत असताना त्यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले आहे.येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.

नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने पटोले यांना विचारण्यात आलं, त्यावर नाना पटोले म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती आणि वंचित आघाडी एकत्र आले तर त्याचा फटका शिवशाहीला नव्हे तर पेशवाईला बसेल”.

प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे संकेत:
दरम्यान, नाना पटोले यांनी काल अकोल्यात बोलताना, प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे संकेत दिले होते. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Title: Congress state president Nana Patole to Prakash Ambedkar news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x