29 March 2024 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

अँटिगा अपहरणामागे भारतीय एजन्सींचा हात, भारतात राजकीय शक्तींपासून जीवाला धोका - मेहुल चौकसीच्या वकिलाचा दावा

Mehul Choksi

अँटीगा, १३ जून | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चौकसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेहुल चौकसी याला अँटिगामधून डोमिनिकामध्ये आणण्यात आले असून तेथून त्याला भारतात आणण्याची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे मेहुल चौकसी यांने डोमिनिका उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ती याचिका नाकारत पळून जाण्याचा धोका असल्याचे सांगितले होते.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. दरम्यान, अँटिगा अपहरण प्रकरणामागे भारतीय एजन्सींचा हात असल्याचा आरोप सुप्रीम कोर्टातील मेहुल चौकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी केला आहे. कारण अँटिगामध्ये ते केस पराभूत होत असल्याने मेहुलचे अपहरण केल्याचे अग्रवाल म्हणाले.

मेहुल चौकसी भारतात का येत नाहीये? काय त्याला आपल्या देशातील लोकशाहीवर भरोसा नाही? भारतीय प्रसार माध्यमांनी मेहुलचे वकील विजय अग्रवाल यांच्याशी संभाषण करत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी वकील विजय अग्रवाल यासंदर्भात वक्तव्य केलं.

 

News Title: Indian agencies hand in Mehul Choksi kidnapping from Antigua political forces threaten his life when he comes to India news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x