20 April 2024 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय ? हे उपाय करून पाहा

swelling face health

मुंबई, १५ जून | तुमचाचेहरा जास्त सुजल्यासारखा वाटतोय? डोळे बारीक दिसू लागले आहेत? उत्तर होय असेल, तर वेळीच सावध व्हा. ही चेहर्‍यावर सूज येण्याची लक्षणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, असे अँलर्जीमुळेही होऊ शकते आणि खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळेही. ही कारणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, शरीरात होणारे अंतर्गत बदल आणि बाह्य कारणांमुळे चेहर्‍यावर सूज येऊ शकते. अनेक वेळा चुकीच्या कॉस्मेटिक्सचा वापर, एखाद्या खाद्यपदार्थाचे वा औषधींचे सेवन केल्यानंतर आणि कधी अँलर्जी निर्माण करणारे घटक श्वासाद्वारे शरीरात गेल्यास असे होऊ शकते, तर अनेकवेळा ओरल कॅव्हिटी वा दातांशी निगडित समस्यांमुळेही चेहर्‍यावर सूज येऊ शकते.

हे उपाय असतात:
तज्ज्ञांच्या मते, चेहर्‍यावर सूज येण्याची ठोस कारणे जाणून घेण्यासाठी पीडिताने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. डॉक्टरच तपासणी करून योग्य ते उपचार करू शकतात. जर एखाद्या औषधाच्या सेवनाने असे झाले असेल तर त्याचे सेवन लगेच बंद करण्याचा आणि अँलर्जी रिअँक्शन असेल तर अँटिबायोटिक घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. जर सूज येण्याबरोबरच थोड्याशा वेदनाही असतील तर अशावेळी इम्फ्लेमेंटरी औषध प्रिस्क्राइब केले जाते. याउलट दातांना असा संसर्ग झाला तर तेव्हाही अँटिबायोटिक वा जास्त त्रास झाल्यास दात काढण्याची वा योग्य उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो.

हे देखील करून पाहा:
* चेहर्‍यावर सूज येण्याची कारणे भले कोणतीही असोत, मात्र ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. जाणून घेऊया याबाबत..

* बर्फ लावा बर्फाचा छोटासा तुकडा चेहर्‍यावर लावल्याने चेहर्‍यावरील सूज कमी होऊ शकते. मुलायम टॉवेल वा एखाद्या कपड्यात बर्फाचा तुकडा ठेवून सूजलेल्या जागी हळूहळू लावा. असे दिवसातून चार ते पाच वेळा करा.

* हळद व चंदन चेहर्‍यावरील सूज वा वेदना दूर करण्यात रक्तचंदन वा हळदीच्या पुडीपासून तयार केलेला लेप बराच परिणामकारक ठरू शकतो. वाळल्यानंतर तो कोमट पाण्याने धुऊन टाका.

* कमी मीठ अधिक सोडियम म्हणजेच जास्त मीठ असलेला आहार घेतल्यानेही चेहर्‍यावर सूज येते. मिठाच्या जास्त प्रमाणामुळे त्वचेचा आतला थर पाणी रोखू लागतो आणि चेहरा सूजल्यासारखा दिसतो. त्यासाठी जास्त मीठ असलेले भोजन टाळा.

* उंच उशी झोपताना वापरल्या जाणारी उशी वा तक्क्या थोडा उंच असायला हवा. तज्ज्ञांच्या मते, जर डोके थोडे उंचवट्यावर असल्यास त्वचेमध्ये पाणी गोळा होणार नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Home remedies on swelling face health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x