29 March 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

Health First | अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे डास मलाच का चावतात? | वाचा सविस्तर

mosquitoes bite

मुंबई, १८ जून | अस्वच्छता, घाणीमुळे डासांची पैदास वाढते. हे डास चावल्याने डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया हे आजार होण्याचीही शक्यता असते. मात्र डास काही लोकांनाच अधिक चावतात. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?.. रक्त गोड असणार्‍या व्यक्तींना अधिक डास चावतात असे मजेखातर म्हटले जाते. मात्र विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याचीही कारणे आहेत.

जाणून घ्या ही कारणे:

ब्लडग्रुप ओ असल्यास:
एखाद्या व्यक्तीचा ब्लडग्रुप ओ असल्यास अशा व्यक्तींमध्ये डास अधिक आकर्षित होतात. त्यानंतर ए ब्लडग्रुप, बी रक्तगट आणि एबी ब्लडग्रुपच्या व्यक्तींकडे डास आकर्षित होतात.

गर्भवती स्त्रिया तसेच लहान मुले:
गर्भवती स्त्रिा तसेच लहान मुलांना डास अधिक प्रमाणात चावतात. मेटाबोलिक रेट अधिक असणार्‍या या व्यक्तींमध्ये डास चावण्याचे प्रमाण जास्त असते.

शरीरातील जनुके mosquitoes magnet असल्यास:
दी जर्नल इन्ङ्खेक्शन, जेनेटिक्स आणि इव्होल्यूशन 2013च्या अभ्यासानुसार शरीरातील काही विशिष्ट जनुके डासांना आकर्षित करतात. ज्या व्यक्तींच्या शरीरात अशी जनुके असतात त्यांना डास अधिक चावतात.

ज्या भागात भरपूर डास आहेत अशा भागातल्या एखाद्या घरात पाच-सहा लोक गप्पा मारत बसले असता डास घोंगावायला लागतात. त्यातला एखादाच माणूस डासांच्या चावण्याने हैराण होतो. मात्र बाकीचे त्याचे मित्र बिलकूल अस्वस्थ होत नाहीत. या संबंधात थोडे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच डास जास्त चावतात आणि ही गोष्ट उघड झाल्यानंतर सगळे चेष्टा मस्करी करायला लागतात. ज्या एकट्याला डास चावतात त्याला प्रश्‍न पडतो की इतर चार-पाच जणांना सोडून डास आपल्यालाच का चावतात? अन्य लोक त्याला म्हणायला लागतात, तुमचे रक्त जास्त गोड असेल म्हणून डास तुम्हाला पसंत करत आहेत. यातली थट्टा मस्करी सोडली तरी शास्त्रज्ञांनी एक गोष्ट मान्य केली आहे की डास काही विशिष्ट लोकांनाच चावतात आणि काहींना चावत नाहीत ही गोष्ट खरी आहे.

असे एखादे निरीक्षण समोर आले की शास्त्रज्ञांच्या विचारांना चालना मिळते आणि ते हे डास एका विशिष्ट व्यक्तीला का चावतात यावर संशोधन करायला लागतात. अमेरिकेत डास नियंत्रक संघटना नावाची एक स्वतंत्र संघटना आहे आणि त्या संघटनेत अनेक संशोधक आहेत. त्यांनी आता या विषयावर संशोधन करायला सुरूवात केली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे हे विशेष असतात आणि एका व्यक्तीसारखे बोटाचे ठसे दुसर्‍या व्यक्तीकडे नसतात, असे म्हटले जाते. तीच गोष्ट घामालाही लागू आहे. या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक माणसाचा घाम वेगळ्या वासाचा आहे आणि एकाच्या घामासारखा वास दुसर्‍याच्या घामाला येत नाही. तिथेच डास एकाच माणसाला का चावतात याचे उत्तर मिळते.

ज्याच्या घामाचा वास डासाला आवडतो त्यांनाच ते चावतात आणि त्यांची ही निवड करण्याचे काम घामातील निरनिराळ्या ४०० द्रव्यांच्या मिश्रणावर अवलंबून असते. ही ४०० मूलद्रव्ये कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या घामात असतात आणि त्यांच्या त्या प्रमाणावर प्रत्येकाच्या घामाचा विशेष वास ठरलेला असतो. आपल्याला ज्याला चावायचे आहे त्याच्या घामाचा वास डासांना ५० मीटर अंतरावरून येतो. एवढे त्याचे घाणेंद्रिय तीव्र असते. दुसर्‍या एका मुद्यावरूनही ठरत असते ज्याचा रक्तगट ओ असणार्‍या व्यक्तींना डास जास्त चावतात आणि अ ग्रुप असणार्‍यांना कमी चावतात. कोणतीही व्यक्ती आपल्या रक्तगटावरून काही संदेश त्याच्या नकळत प्रारित करत असते आणि तोच डासांसाठी इशारा असतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Why mosquitoes bite to particular peoples health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x