29 March 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Health First | रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी जास्वंदीचे फुल गुणकारी - वाचा सविस्तर

Hibiscus health benefits

मुंबई, १३ जुलै | जास्वंदीचे लाल फुल समोर येताच आपल्याला गणपती बाप्पाची आठवण होते. या फुलाशी जसे आध्यात्मिक नाते आहे तसेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. गणपतीला जास्वंद वाहिल्याने आपली सगळी विघ्न दूर होतात आणि बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतो, अशी आपली श्रद्धा आहे. त्याचबरोबर जास्वंदीचा चहा घेतल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल व त्यातून अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. कारण अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की जास्वंदीचे फुल हे रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास मदत करते.

अभ्यासावरून असे दिसून आले रक्तदाबाच्या औषधांपेक्षा म्हणजेच lisinopril आणि hydrochlorothiazide च्या तुलनेत जास्वंद अधिक प्रभावशाली आहे. संशोधकांनुसार anthocyanins मुळे फुलाला लाल रंग प्राप्त होतो व त्यामुळेच रक्तदाब कमी होण्यास मदत होते. एका संशोधनात hydrochlorothiazide आणि जास्वंदाच्या फुलाची क्षमता तपासण्यात आली. त्यातून असे सिद्ध झाले की जास्वंदीचे फुल हे औषधापेक्षा अधिक परिणामकारक आहे. आणि त्यामुळे electrolyte imbalance देखील होत नाही. तसंच जास्वंदीच्या फुलाचा परिणाम हा hydrochlorothiazide पेक्षा दीर्घ काळापर्यंत राहतो.

जास्वंदीचा चहा कसा बनवाल ?
जास्वंदीच्या लालचुटूक पाकळ्या या उच्च रक्तदाबावर अतिशय फायदेशीर असतात. तसंच त्याचे काही दुष्परिणाम देखील नसतात. ऑनलाईन तुमची याचे पॅक विकत घेऊ शकता किंवा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी देखील बनवू शकता. जाणून घेऊया जास्वंदीचा चहा बनवण्याची पद्धत.

साहीत्य:
* १ जास्वंदाचं फुल
* १ कप पाणी
* १ लवंग
* १ छोटी दालचिनीची कांडी

कृती:
एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात लवंग आणि दालचिनीची काडी टाका. पाणी उकळेपर्यंत थांबा. पाणी उकळ्यावर त्यात जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या घाला आणि पाणी पूर्ण उकाळ्यानंतर गॅस बंद करा. मग भांड्यावर झाकण ठेवा आणि चहा थोडा थंड होऊ द्या. हा चहा तुम्ही गरमागरम पिऊ शकता किंवा त्यात बर्फ आणि मध घालून घेऊ शकता. मध चहा गरम असताना घालू नका. चहाच्या लालसर रंगानेच तुम्हाला प्रसन्न वाटेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Hibiscus natural remedy on high blood pressure news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x