20 April 2024 1:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

भारत V/S श्रीलंका पहिला वनडे​​​​​​ | लंकेची प्रथम फलंदाजी, 4 षटकांमध्ये स्कोअर 23/0

India Vs Sri Lanka

कोलंबो, १८ जुलै | श्रीलंकेने नाणेफेक जिंकून कोलंबोमध्ये भारताविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका क्रीजवर आहेत. श्रीलंकेने 4 षटकांत 23 धावा केल्या. ईशान किशनचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. यापूर्वी त्याने मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध टी -20 सामन्यात डेब्यू केला होता. आपल्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इशान हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 1990 मध्ये गुरशरण सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे काम केले होते. एकूणच इशान हा असे करणारा 16 वा खेळाडू आहे.

सूर्यकुमार यादवदेखील भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. त्याने देखील मार्चमध्ये इशानबरोबर इंग्लंडविरुद्ध टी -20 सामन्यात पदार्पण केले होते. आता दोघेही एकत्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड भारतीय संघाबरोबर आहेत.

दोन्हीही संघ
भारत : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, धनंजय डिसिल्वा, चरिथ असालंका, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, इसरु उदाना, दुष्मंथा चमीरा, लक्षण संदाकन.

चहल आणि कुलदीप 2 वर्षांनंतर एकत्र:
या सामन्यात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव स्पिनची कमान सांभाळत आहेत. जवळजवळ 2 वर्षानंतर दोघेही भारतीय संघात एकत्र आहेत. यापूर्वी, एजबेस्टन येथे 2019 च्या विश्वचषकात चहल आणि कुलदीप यांनी इंग्लंडविरुद्ध सामना खेळला होता.

114 दिवसांनंतर भारतीय संघ वन डेमध्ये मैदानात उतरला आहे. भारताने अखेरचा एकदिवसीय सामना मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तर, श्रीलंकेच्या संघाने नुकताच इंग्लंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. जवळपासस चार वर्षांनंतर दोन्हीही संघ एकमेकांसोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: India Vs Sri Lanka 1st One Day live cricket match news updates.

हॅशटॅग्स

#Cricket(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x