24 April 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर

How to apply for birth certificate online

मुंबई, २० जुलै | जन्म-मृत्यूचा दाखला आता ऑनलाइन पद्धतीने जगात कुठेही मिळू शकेल. सुमारे 80 लाख जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन देण्याचा मार्ग खुला होणार आहे. देश-विदेशांतील मुंबईकरांना जन्म-मृत्यू दाखला सहजपणे मिळू लागेल. प्रमाणपत्रे ऑनलाइन देताना या सर्व प्रमाणपत्रांवर “क्‍यूआर कोड’ (क्विक रिस्पॉन्स कोड) नमूद केला जाईल. त्यामुळे या प्रमाणपत्रांची अधिकृतता ऑनलाइन पद्धतीनेच तपासता येईल. त्याअंतर्गत जन्म-मृत्यूविषयक प्रमाणपत्रावरील “क्‍यूआर कोड’ ऍण्ड्रॉईड आधारित भ्रमणध्वनीमधील “क्‍यूआर कोड रीडर’ या ऍपच्या साह्याने कॅमेऱ्याद्वारे स्कॅन केल्यास भ्रमणध्वनीवर इंटरनेट ब्राऊजरवर संबंधित संकेतस्थळावरील प्रमाणपत्राचे पान उघडले जाईल.

जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती:
* जन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.

* त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

* आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.

* त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.

* हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील “जन्म नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

* त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “जन्म नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे..

जन्म नोंद दाखला-अर्जदाराची माहिती:
* अर्जदाराची माहिती यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), जन्म तारीख, आधार क्रमांक, हि सर्व माहिती टाकायची आहे. व “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

* समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल “तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला” आहे.व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.

* तसेच त्या मॅसेज मध्ये शुल्क भरा हा ऑपशन येईल, जन्म नोंद दाखला काढण्यासाठी २३.६० एवढे शुल्क आकारले जाते,ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit /Debit Card ,IMPS ,UPI या माध्यमातून भरू शकता.

* शुल्क भरल्यानंतर तुम्हाला 5 दिवसातच जन्म नोंद दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for birth certificate online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x