23 April 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

1930 पासून मुस्लिमांची लोकसंख्या वाढली | कारण भारताला पाकिस्तान बनवायचे होते - मोहन भागवत

RSS Meeting

नागपूर, २१ जुलै | दोन दिवसांच्या आसाम दौर्‍यावर आलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी आता मुस्लिम आणि पाकिस्तानविषयी नवीन विधान केले आहे. संघ प्रमुख म्हणाले की, 1930 पासून भारतातील मुस्लिमांची संख्या नियोजित पद्धतीने वाढवण्यात आली. ते म्हणाले होते की बंगाल, आसाम आणि सिंध यांनाही पाकिस्तान बनवण्याची योजना होती. ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही, परंतु फाळणीनंतर पाकिस्तानची स्थापना झाली.

मोहन भागवत यांनी गुवाहाटीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या उपस्थितीत NRC-CAA वर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यांनी CAA-NRC वर मुस्लिमांची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले- NRC-CAA हिंदू-मुस्लिम विभाजन म्हणून मांडणे हा एक राजकीय कट आहे. हे राजकीय फायद्यासाठी केले जात आहे.

भागवत पुढे म्हणाले की, भारतात अल्पसंख्यांवर विशेष लक्ष्य ठेवले जाईल, असे देशाचे पहिले पंतप्रधान म्हणाले होते. तेव्हापासून आतापर्यंत अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जात आहे. CAA मुळे कुठल्याच मुस्लिमाचे नुकसान होणार नाही. हा कायदा शेजारील देशातील पीडित अल्पसंख्यांकासाठी आणला आहे. दरम्यान, यापूर्वी 4 जुलै रोजी भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सर्व भारतीयांचा DNA एकच असल्याचे म्हटले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: RSS Chief Mohan Bhgawat talked on Muslim population in India news updates.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x