19 April 2024 9:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले | रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा

IPS officer Rashmi Shukla

मुंबई, २९ जुलै | पोलिस दलात क्रीम पोस्टिंग आणि बदल्यांतील भ्रष्टाचारावर निगराणी ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. शुक्लांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानींनी बाजू मांडली. सीआयडीच्या प्रमुख असताना शुक्ला यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांकडून काही फोन नंबर्सवर निगराणी ठेवण्याचे आदेश मिळाले होते.

पोलिस दलात मोक्याच्या ठिकाणी नियुक्ती आणि बदल्यांसाठी कार्यरत दलालांचे काही राजकीय नेत्यांशी लागेबांधे होते. गलेलठ्ठ रकमा घेऊन या बदल्या होत होत्या, असे जेठमलानी यांनी न्यायालयास सांगितले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे.जमादार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार शुक्ला यांनी तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही परवानगी घेतली होती.

दरम्यान, १७ जुलै ते २९ जुलै २०२० दरम्यान निगराणी करण्याची परवानगी कुंटे यांनी दिली होती. २५ मार्च २०२१ रोजी कुंटे यांनी दिलेल्या अहवालातही हे नमूद आहे. मात्र नंतर परवानगी मिळवताना आपली दिशाभूल केली, असा दावा कुंटे यांनी करून शुक्ला यांना बळीचा बकरा बनवले, असा युक्तिवाद त्यांनी केला.

गुन्हे रोखण्यासाठी कायद्याच्या बंधनात राहून वायरलेस संदेशांवर देखरेख ठेवणे, टॅप करणे हे नियमांना धरून आहे, असा दावा रश्मी शुक्लांच्या वकिलांनी केला. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होईल. तोपर्यंत पोलिसांनी शुक्ला यांच्यावर कोणतीही दंडात्मक किंवा अटकेची कारवाई करु नये, असं हायकोर्टाने निर्देश दिले. रश्मी शुक्ला सध्या CRPF च्या अतिरिक्त महासंचालक आहेत. सध्या त्या हैदराबादमध्ये सेवा बजावत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Phone tapping in Maharashtra had received government permission claim IPS Rashmi Shukla in Bombay high court news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x