28 March 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

तुम्ही चांगले वडील आहात की नाही? | कसं ओळखाल? - नक्की वाचा

How to Know You are Being a Good Father

मुंबई, ०१ ऑगस्ट | कोणीही जन्मतःच काहीही शिकले नाही आणि असे जीवन आहे जे आपल्याला काय करावे आणि कसे थोडेसे सुधारले पाहिजे हे शिकवते. जेव्हा आपण तरुण आहात तेव्हा आपण पिता किंवा आई कसे होऊ शकता याचा विचार करू नका, आपल्या पालकांनी आपल्याला जीवन दिले आणि नेहमीच आपली काळजी घेतली, आपल्याला माहित असतं की ते आपल्यावर बिनशर्त प्रेम करतात.

आपण सध्या पालक असल्यास आणि आपण खरोखर एक चांगले पालक आहात की नाही हे माहित नसल्यास, आपण खरोखर पालकत्व आणि पालकत्व कलेत पारंगत आहात की नाही हे शोधण्याची आवश्यकता असू शकते. बरेच वडील आणि बर्‍याच माता महान वडील आणि महान माता असतात आणि त्यांना याची जाणीव देखील नसते. आपल्याला एक चांगला पिता किंवा एक चांगली आई व्हायला हवी त्या महान प्रयत्नांचे आणि मोठ्या मूल्याचे आपल्याला कौतुक करावे लागेल. या सर्व कारणांसाठी, अशी काही चिन्हे गमावू नका की जी आपल्याला या कलेवर प्रभुत्व मिळवितात हे जाणून घेण्यास मदत करू शकतात

बाळाच्या उत्तम संगोपनासाठी आई आणि वडील दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते. मात्र, सामान्यतः समाजात ही जबाबदारी आईच पेलताना दिसते. भारतात तर मूल वडिलांना घाबरतं, असं चित्र आहे. जुन्या काळी वडील घरात येताच घरातली पोरंसोरं आईच्या पदराआड लपायची. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर मुलींच्या तुलनेत मुलं जसजशी मोठी व्हायची तसे ते वडिलांसोबत वेळ घालवू लागायचे.

मात्र, मुलगी आणि वडील यांच्यात एक प्रकारचा दुरावा कायम असायचा. ती कधीच वडिलांसमोर ताठ मानेने उभी राहायची नाही. कधी वडील मुलांसोबत वेळ घालवताना दिसले किंवा मुलांना कडेवर घेतलं की लोक त्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर अशा शब्दात हिणवायचे. घरातली वडीलधारी मंडळीसुद्धा सांगायची की वडिलांनी मुलांशी जास्त सलगी करू नये.

विकसित राष्ट्रांमध्ये मात्र परिस्थिती थोडी निराळी होती. असं असलं तरी तिथेसुद्धा मुलांच्या संगोपनाची महत्त्वाची जबाबदारी आईच पार पाडते. नोकरी करणारे आई-वडीलही स्वतःच्या अनुपस्थितीत मुलांची काळजी घेण्यासाठी एखादी आया नेमतात. आयाची भूमिका स्त्रीच निभावते. कारण एक स्त्रीच मुलाची चांगली काळजी घेऊ शकते, असा एक सर्वमान्य समज आहे.

मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असं सिद्ध झालं आहे की बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासात पुरूषाची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत मुलांच्या विकासावर जे काही संशोधन झालं आहे, त्या सर्वांमध्ये केवळ आईच्याच भूमिकेवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. संगोपनात वडिलांचं असलेल्या महत्त्वाविषयी चर्चाच झालेली नाही. जगात असे अनेक समुदाय आहेत जिथे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पुरूष उचलतात आणि ती मुलं सर्वांगाने उत्तम व्यक्ती म्हणून घडते. उदाहरणार्थ मध्य आफ्रिका प्रजासत्ताकमधल्या एका समुदायात स्त्रिया बाहेर जाऊन कमावतात आणि पुरूष घरात मुलांची काळजी घेतात.

इथला समाज हा समानतेच्या मूल्यावर आधारित असला तरी समाजातल्या पुरूषांना सर्वोत्तम वडील असल्याचा किताब मिळाला आहे. 1970 पर्यंत मुलांच्या विकासात वडिलांच्या भूमिकेविषयी फारच कमी संशोधन झालं होतं. आत्तापर्यंत फक्त वडिलांच्या आर्थिक बाजूच्या महत्त्वाविषयीच संशोधन व्हायचं. मात्र, नव्या संशोधनात वडिलांच्या बालसंगोपनातल्या भूमिकेलाही समान महत्व देण्यात येतंय. यावरून मुलाच्या विकासात वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाचं असल्याचं समोर येतंय.

याविषयातील मानसशास्त्रज्ञ तज्ज्ञ काय सांगतात?
* आई आणि वडील दोघंही मुलासाठी गरजेचे असतात. मुलाच्या विकासात केवळ वडीलच नाही तर सावत्र वडील, आजोबा, काका, मामा यांच्या भूमिकेवरही संशोधन करण्यात आलं आहे. यावरून कळतं की आजी, काकू, मावशी आणि आत्या यांच्याप्रमाणेच मुलाच्या संगोपनात त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

* मुलांची काळजी घेतानाच्या काळात ज्या प्रकारचे हार्मोनल बदल आईमध्ये होतात तेच वडिलांमध्येही होतात. बाळाला सांभाळायची जबाबदारी आपलीदेखील आहे, हे जेव्हा त्यांचा मेंदू स्वीकारतो तेव्हा त्यांच्यामध्येही आईप्रमाणेच बाळाप्रती ओढ निर्माण होते.

* संशोधनात असं आढळलं आहे की ज्या बाळांचं संगोपन वडिलांच्या देखरेखीत होतं, त्यांना भविष्यात समाजात स्वतःच्या वागणुकीविषयी अडचणी येत नाहीत. उलट केवळ आईच्या देखरेखीखाली वाढणाऱ्या मुलांमधले बरेचसे गुण पूर्णपणे विकसित होऊ शकत नाहीत. इतकंच नाही तर ज्या मुलांचं त्यांचे वडील, आजोबा यांच्याशी चांगलं जमतं त्यांची त्यांचे शिक्षक आणि मित्रांशी असलेली वागणुकही संतुलित असते.

नाती कशी तयार होतात?
१. बाळाच्या संगोपनाची आई आणि वडील दोघांचीही पद्धत वेगवेगळी असते. आई मुलांची काळजी घेऊन, त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांच्याशी नातं घट्ट करते.

२. तर वडील मुलांसोबत खेळून, त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन त्यांच्याशी नातं जुळवतात. बहुतांश मुलांना धाडस आवडतं. सामान्यपणे आई मुलांशी अशी वागत नाही. मुलं पडतील, त्यांना दुखापत होईल, या भीतीने ती मुलांना फार दंगामस्ती करू देत नाही.

३. पुरुषांच्या उपस्थितीत मुलांना त्यांना हवं ते करण्याची संधी मिळते आणि ते कसलीही भीती न बाळगता त्यांना आवडतं ते करतात. अशी मुलं अधिक निडर असतात.

४. आई आणि वडील दोघांनाही सारखी रजा देणाऱ्या ब्रिटनसारख्या देशामध्येही खूपच कमी म्हणजे जवळपास 2% जोडपीच ही रजा घेतात.

५. मूल प्रत्येक काम हे खेळण्यातून शिकत असतं. संशोधनात आढळलं आहे की जे वडील मुलांच्या आकलन शक्तीचा विकास होण्याच्या काळात त्यांच्याशी खेळू लागतात त्यांचं त्यांच्या मुलांशी घट्ट नातं तयार होतं आणि त्यांच्यात इतर मुलांचा सामना करण्याचं धाडसंही येतं.

६. मुलं खेळण्यातूनच स्वतःचं जग निर्माण करतात. जे वडील मुलांना अधिक वेळ देतात त्यांच्या मुलांमध्ये भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याचं धाडसं येतं. दोन वर्षाच्या वयात मुलं सर्व प्रकारचे आकार ओळखू लागतात. त्यांचा मानसिक विकास वेगाने होत असतो.

तज्ञांनुसार वडिलांनी मुलं थोडी मोठी होण्याची वाट बघू नये. आईप्रमाणेच वडिलांनीही बाळ जन्मताच त्याच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली पाहिजे. त्याला कुशीत घेऊन, त्याच्या डोळ्यात डोळे टाकून त्याच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. बाळाला हे कळत नसतं. मात्र, त्याचं वडिलांसोबत नातं तयार व्हायला सुरुवात होते. मात्र, आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही, अशी भीती बहुतांश वडिलांना असते.

मात्र, हीच भावना नव्याने आई होणाऱ्या स्त्रीचीही असते. काही पुरुषांना नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी जमत असतात. परंतु, बहुतांश पुरुषांना ही कला अवगत करावी लागते. आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे. वडील आणि मुलांच्या नात्यावर अनेक प्रकारचे व्हीडिओ ऑनलाईन उपलब्ध आहेत. परदेशांमध्ये तर याविषयावर खास शिकवणी वर्गही असतात. परिस्थिती बदलत आहे. तरीदेखील जगभरात बालसंगोपनाची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणावर आईच पार पाडत असते. या कामातही पुरुषांनी स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची वेळ आता आली आहे. हे त्यांच्या मुलांसाठीही फायद्याचं ठरेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to know you are being a good father information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#FamilyFirst(7)#Social(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x