25 April 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन'साठी महाराष्ट्राचा 'ज्युनिअर मिल्खा सिंग' साईश्वर गुंटूक'ची निवड

सोलापूर : तब्बल २१ किलोमीटरच्या कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन’साठी महाराष्ट्रातील सोलापूरचा सात वर्षीय ‘ज्युनिअर मिल्खा सिंग’ म्हणजे साईश्वर गुंटूक’ची निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा उणे ६ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानात आणि अतिशय दुर्गम भागात पार पडणार आहे.

या मानाच्या स्पर्धेत परदेशातील म्हणजे ब्राझील, आयर्लंड, मेक्सिको, स्पेन, यू.एस.ए तसेच इंग्लंड पासून ते भारतातील जवळपास सर्वच राज्यातून मोठे स्पर्धक भाग घेतात. अशा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ७ वर्षीय ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ म्हणजे साईश्वर गुंटूक’ची निवड झाली आहे. पंजाब मधील नॅशनल सोलन हाफ डोंगरी मॅरेथॉन ही ११ किलोमीटरची स्पर्धा त्याने अवघ्या २.०३ तासात जिंकून जागतिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना डोक्याला हात लावायची वेळ आणली. त्याचवेळी पंजाबच्या क्रीडामंत्र्यांच्या हस्ते साईश्वरला ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आलं.

साईश्वरच्या त्या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन’साठी निवड सरहद फाउंडेशनचे चेअरमन आणि फाऊंडर संजीव शहा आणि अरविंद बिजवे यांनी केली आहे. त्यामुळे साईश्वरची गुणवत्ता इथेच सिद्ध होत आहे. इतर राज्यात आणि इंटरनॅशनल स्पर्धेत साईश्वरची गुणवत्ता आयोजकांना स्पष्ट दिसत असली तरी मुंबई मॅरेथॉन तसेच इतर अनेक मॅरेथॉन स्पर्धेत त्याला निराशा पदरी पडत आहे.

त्यामुळेच साईश्वरच्या वडिलांनी साईश्वरला घेऊन कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यांच्या अडचणी समजून घेऊन राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेण्याचे आश्वासन साईश्वरचे वडील केशव गुंटूक यांना दिल आहे. त्यामुळे त्यांना मुंबई मॅरेथॉन आणि इतर स्पर्धांबाबत अशा निर्माण झाली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x