19 April 2024 12:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

मानवी कृतींमुळेच ग्लोबल वॉर्मिंग | दुष्परिणाम हे सर्वांना भोगावेच लागणार - संयुक्त राष्ट्र समितीचा अहवाल

Global warming impact

वॉशिंग्टन, ०९ ऑगस्ट | मानव समुदायाने आजघडीला कार्बन ऊत्सर्जन लक्षणीयरित्या कमी केले तरीही काही दुष्परिणाम हे टाळणे अशक्यच असल्याचा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील आंतरसरकारी समितीने सोमवारी प्रकाशित केलेल्या एका ताज्या अहवालातून दिला आहे. आपण अगोदरच इतके ऊत्सर्जन करून ठेवले आहे की, त्याचे काही गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागणार असल्याचे या अहवालाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

या तीन हजार पानी अहवालाच्या निष्कर्षानुसार दोन्ही ध्रुवांवरील हिमनग अतिशय वेगाने वितळत असून सागरी पाणीपातळीही त्याच वेगाने वाढत आहे. याच्या परिणामी ऋतुचक्रातही अतीतीव्र टोकाचे बदल बघायला मिळत आहे. विनाशकारी चक्रीवादळे, महापूर, अतिवृष्टी, ढगफुटी, अतीतीव्र उष्णता आणि अतीतीव्र थंडीच्या लाटा हे याचेच परिणाम आहेत. आज आपण ऊत्सर्जनात लक्षणीय घट केली तरी काही दुष्परिणाम हे टाळता येणे अशक्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कारण आपण आधीच वातावरणात मोठ्या प्रमाणात हरीतगृह वायूंचे ऊत्सर्जन करून ठेवले आहे असे यात स्पष्टपणे म्हटले आहे.

मानवी कृतींमुळेच ग्लोबल:
वॉर्मिंगऔद्योगिकीकरणानंतरच्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी प्रामुख्याने उष्णता शोषून घेणारे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारखे वायू कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मानवी कृतीद्वारे कोळसा, इंधन, तेल, लाकडू आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून हे निर्माण झाले आहे. यात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाचा अगदीच थोडा वाटा असल्याचे यात म्हटले आहे.

पॅरिस करारानंतरही तापमान वाढ सुरूच:
या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजेच 2100 पर्यंत ग्लोबल वॉर्मिंग 2 अंश सेल्सिअसने कमी करण्यासाठी जवळपास सर्वच देशांनी 2015 मध्ये पॅरिस करारावर स्वाक्षरी करून कार्बन ऊत्सर्जन कमी करण्याचे ठरविले होते. मात्र संशोधकांच्या अभ्यासानुसार येत्या 2030 पर्यंतच जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हे धोक्याचेच संकेत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Global warming impact on environment alert by united nations committee news updates.

हॅशटॅग्स

#GlobalWarming(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x