28 March 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

Special Recipe | हॉटेलसारखा चवदार दावणगिरी लोणी डोसा - पहा खास रेसिपी

Davangiri Loni Dosa recipe in Marathi

मुंबई ९ ऑगस्ट : दक्षिण भारतातील प्रसिद्ध नाश्त्याचा प्रकार म्हणजे डोसा, वडा, इडली आणि उत्तपा . त्यातल्या त्यात दावणगिरी डोसा म्हणजे डोश्यातला काहीसा नवीन प्रकार. अतिशय चवदार आणि लुसलुशीत दावणगिरी डोश्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.

साहित्य :
* 1/2 वाटी साबुदाणे
* 1/2 वाटी उडिद डाळ
* 1 वाटी जाडे पोहे
* 4 वाट्या तांदूळ
* 15,16 मेथीचे दाणे
* 1 टीस्पून खाण्याचा सोडा
* मीठ चवीनुसार
* लोणी आवश्यकतेनुसार

कृती :
१.
प्रथम साबुदाणे, उडिद डाळ, जाडे पोहे, तांदूळ, मेथीचे दाणे हे सर्व कमित कमी 5 तास भिजत ठेवा.
2. नंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे. जराही रवाळ नको.
3. आता यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत पुन्हा 5,6 तास ठेवावे.
4. डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे. इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर जाड आपोआत पसरले जाईल.
5. डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही.
6. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा. डोसा पसरवताना हातानेच तवा गोल फिरवावा. वरुन वाटीने किंवा पळीने पसरावे लागू नये. नाहीतर जाळीदार होणार नाही.
7. डोसा होत आल्यावर वरुन चमचाभर लोणी घालावे.
8. डोसा उलटून खालील बाजूने होऊ द्यावा.
9. लगेचच डोसा तव्यावरुन काढुन डिश मध्ये घ्यावा. छानसे लोणी लाऊन चटणी, सांबार, सॉस कशाही सोबत गरमागरम सर्व्ह करावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Davangiri Loni Dosa recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x