23 April 2024 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

मोदींच्या गुजरातमध्ये खेळाडूंची अनास्था | देशाला अंध वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू करतोय मजुरी

Cricketer Naresh Tumda

गांधीनगर, ०९ ऑगस्ट | सध्या टोक्यो ऑलिम्पिक २०२० पार पडली. यामध्ये भारतानेएकूण 7 पदकं जिंकली आहेत. त्यानंतर पदक विजेत्या भारतीय खेळाडूंवर विविध माध्यमातून पैशाचा पाऊस पडत आहे. मोदींनी तर या खेळाडूंच्या यशप्राप्तीवरून स्वतःचा मोठा PR केल्याचं देखील लपून राहिलेलं नाही. विशेष म्हणजे मोदी सरकारने ऑलिम्पिक वर्ष असताना देखील यावर्षीच्या स्पोर्ट्स बजेटमध्ये तब्बल २३० कोटीची काटछाट केली होती. त्यामुळे मोदी सरकारची अनास्था तेव्हाच स्पष्ट झाली होती.

मात्र क्रीडा स्पर्धांप्रती मोदींच्या गुजरातमध्ये गुणी खेळाडूंची काय बिकट अवस्था आहे त्याची देखील अजून प्रचिती आहे. खेळात गुरुचं देखील मोठं स्थान असतं पण गुजरातमध्ये तर कोच म्हणजे स्पर्धकांच्या गुरूंना प्रोत्साहन म्हणून कोणतेही प्रोत्साहन भत्ते किंवा इन्सेन्टिव्ह दिले जातात. आता अजून एक वास्तव समोर आलं आहे.

2018 सालच्या अंध खेळाडूंच्या क्रिकेट विश्वचषकाची यावेळी भारतीय संघातील एक महत्वाचा खेळाडू होता नरेश तुमदा. गुजरातच्या नवसारी मधील नरेश तुमदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील खेळाडू होता. दुबईत शारजाह येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानच्या 308 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताला विश्व चषक जिंकवून दिला होता.

नरेश तुमदा सध्या मजुरांप्रमाणे काम करुन स्वत:सह कुटुंबाच पोट भरत आहे. भारताला अंध व्यक्तींचा क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणारा नरेश आज पोटाची खळगी भरण्यासाठी नवसारीत 250 रुपये रोंजदारीवर काम करत आहे. यावर बोलताना तो म्हणाला, “मी प्रतिदिवस 250 रुपये कमवतो. मी आतापर्यंत तीन वेळा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी गेलो आह. मला एखादी सरकारी नोकरी मिळेल का? अशी विनंती केली. पण अजूनपर्यंत मला कोणतंच सकारात्मक उत्तर आलेल नाही” असं त्याने सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 2018 Blind Cricket World Cup team member Naresh Tumda works as a labourer in Gujarat news updates.

हॅशटॅग्स

#Special(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x