29 March 2024 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

राज्यातील शिव स्मारक पहिल्या विटेच्या प्रतीक्षेत, तर सरदार पटेलांचा १९८९ कोटीचा पुतळा येत्या ३० दिवसांनी पूर्ण होणार

अहमदाबाद : गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच आणि तब्बल १९८९ कोटी रुपये खर्चून भव्य असा पुतळा येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असं लिखित निवेदन खुद्द गुजरात सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे.

स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी हा पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेतला असून त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु केली आहे. गुजरात सरकारकडून या स्थळाचे ‘एकता की प्रतिमा’ असे नामकरण करण्यात आले आहे. नर्मदा नदीवरील एक लहान साधू बेटावर हा पुतळा उभारला आला असून, अंतर्गत स्टील तसेच ब्राँझचे काम १० सप्टेंबर आणि २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. या पुतळा उभारणीचे काम येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री विजय रुपाणींना देण्यात आली आहे.

या १८२ मीटर उंच पुतळ्यासाठी तब्बल १९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पुतळ्याच्या कामाची पाहणी करताना विजय रूपानी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून एका महान नेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने नेहमीच सरदार पटेल यांचा वारसा दुर्लक्ष केला आणि केवळ नेहरू-गांधी घराण्याचेच स्मरण केले’ अशी प्रतिक्रिया नोंदवली.

पंतप्रधान मोदी गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांचं १८२ मीटर उंचीच तसेच तब्बल १९८९ कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक वेळेत आणि मोठया दिमाखात पूर्णत्वास नेण्यास यशस्वी झाले असले तरी तेच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची एक वीट सुद्धा रचण्यात यशस्वी झाले नाहीत.  परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाचे मागील ४ वर्षात दोनवेळा जाहीर प्रदर्शन मांडत जलपूजन व भूमिपूजन सोहळा करून स्वतःचा माध्यमांवर डंका वाजवून घेतला. परंतु एक वीट काही रचता आली नाही हे वास्तव आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x