29 March 2024 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

महापालिका निवडणुकांसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना | निवडणूक आयोगाकडून तयारी

Mumbai Municipal Election 2022

मुंबई, २६ ऑगस्ट | राज्यातील १८ महापालिकांची मुदत २०२२ मध्ये संपत आहे. या महापालिकांच्या प्रभाग रचनेची तयारी करण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. याबाबतचे आदेश आयोगाकडून बुधवारी काढण्यात आले. राज्य शासनाच्या निर्णयानुसार एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना आदेश बजाविले आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना, निवडणूक आयोगाकडून तयारी – Formation of one member ward for municipal elections preparation by Election Commission :

या आदेशानुसार सध्या तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड रचना सुरू करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. 25) सन 2022 रोजी मुदत संपुष्टात येत असलेल्या राज्यातील 18 महापालिकांच्या आयुक्तांना आदेश बजावला.

पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिकांची मुदत 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. या महापालिकांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 31 डिसेंबर 2019 रोजी राज्य शासनाने राज्यातील महापालिकांमधील बहुसदस्यीय पद्धत बंद करून एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. शासनाच्या या निर्णयानुसार महापालिकांच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आणि कच्चा आराखडा तयार करण्याबाबत सूचविण्यात आले आहे. सन 2011 ची जनगणना विचारात घेऊन मतदारसंख्या निश्चित केली जाणार असून, अद्ययावत मतदार याद्याही तयार करण्याबाबत सूचविले आहे. प्रभागाची प्रारूप रचनेचे काम 27 ऑगस्टपासून हाती घेण्यात यावे तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम यथावकाश निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

Formation of one member ward for municipal elections 2022 :

राज्य शासनाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा डिसेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेचे काम हाती घेतले असले तरी मुंबई वगळता इतर ठिकाणी द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये खलबते सुरू आहेत. राज्य शासनाने नजीकच्या काळात निर्णय घेतल्यास तसेच त्याला विधीमंडळाची मान्यता मिळाल्यास सध्या बनविण्यात येणाऱ्या प्रारूप एकसदस्यीय प्रभाग रचनेला अंतिम रुप देताना दोन प्रभाग एकत्र करून द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनेही निवडणूका होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय राज्य सरकारवर अवलंबून राहणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Formation of one member ward for municipal elections preparation by Election Commission news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x