20 April 2024 5:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

सोलापुरातील काँग्रेस भवनावर हल्ला | दगड आणि शाई फेकून हल्लेखोर फरार

Maharashtra Congress

सोलापुर, २८ ऑगस्ट | सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवनवर आज शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक आणि शाई फेकून नव्या राजकिय वादाला सुरुवात केली आहे. काँग्रेस भवन येथे हल्ला झाला याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे धावून आले.

सोलापुरातील काँग्रेस भवनावर हल्ला, दगड आणि शाई फेकून हल्लेखोर फरार – Attack on congress Solapur office :

सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या फलकावर शाई फेकली:
काँग्रेस भवन समोरील बाजूस माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अज्ञात समाजकंटकांनी काँग्रेस भवन समोरील भागात असलेल्या फ्लेक्स किंवा डिजिटल बोर्डावर शाई फेकून निघून गेले. याची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी बादली भर पाणी आणून सर्व डिजिटल बोर्ड पुसण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी काँग्रेस भवन येथे येऊन पाहणी केली आणि निंदकाचे घर असावे शेजारी असा टोमणा मारला. चार दिवसांपूर्वी सोलापुरातील काँग्रेस भवन येथे बैठक सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यावर नाराजी व्यक्त करत वाद केला होता. वाद मोठ्या प्रमाणात होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. पण काँग्रेसच्या इतर पदाधिकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला होता. यावर माहिती देण्यास काँग्रेसच्या शहर अध्यक्षकांनी टाळाटाळ केली. त्यांनी विरोधकांवर आरोप करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

पोलिसांचा तपास सुरू:
काँग्रेस भवन हे जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. याची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे हे घटनास्थळी आले आणि पंचनामा करून अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून हल्लेखोरांना पकडून कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Attack on congress Solapur office.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x