10 April 2024 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | शेअरची किंमत 52 रुपये! एका वर्षात दिला 2244 टक्के परतावा, दररोज अप्पर सर्किट हीट GTL Share Price | स्वस्त शेअर तेजीने पैसे वाढवतोय, 3 वर्षांत 8690% परतावा दिला, कंपनीकडून आली मोठी अपडेट Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | आयआरईडीए स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर केली Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस जाहीर EPF Money Transfer | खासगी नोकरदारांसाठी मोठी अपडेट, पगारातील EPF रक्कम ट्रान्स्फरबाबत महत्वाचा निर्णय Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांचा महिन्याचा खर्च भागेल, या योजनांमधील बचत मोठा परतावा देईल
x

सामान्यांचे जगणे महाग | घरगुती एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला

LPG cylinder price

मुंबई, ०१ ऑगस्ट | सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.50 रुपये झाले आहे. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

सामान्यांचे जगणे महाग, घरगुती एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला – Domestic LPG cylinder rates hike by rupees 25 in India :

15 दिवसांत सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले:
यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच 15 दिवसात विनाअनुदानित सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले आहे.

2021 मध्ये गॅस सिलिंडर 190.50 रुपयांनी महाग झाले:
या वर्षी 1 जानेवारीला दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती. आता सिलिंडरची किंमत 884.5 रुपये आहे. म्हणजेच जानेवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 190.50 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या 7 वर्षात गॅस सिलिंडरची किंमत दुप्पट झाली आहे:
गेल्या 7 वर्षांत घरगुती गॅस सिलिंडर (14.2 किलो) ची किंमत दुप्पट होऊन 884.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. 1 मार्च 2014 रोजी 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 410.5 रुपये होती, जी आता 884.50 रुपये आहे.

19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत:
दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, मुंबईत 1,649 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रति सिलिंडर आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Domestic LPG cylinder rates hike by rupees 25 in India.

हॅशटॅग्स

#LPG(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x