29 March 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

फोन टॅपिंग प्रकरण | रश्मी शुक्ला आरोपी नाहीत - राज्य सरकार

Phone tapping case

मुंबई, ०६ सप्टेंबर | फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस बदल्यांशी निगडीत दस्ताऐवज लिक करण्याच्या प्रकरणात सीनियर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आरोपी नाहीत. त्यामुळे त्या एफआयआर रद्द करण्याची याचिका करू शकत नाहीत’, असा युक्तिवाद राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

फोन टॅपिंग प्रकरण, रश्मी शुक्ला आरोपी नाहीत – Phone tapping case IPS Rashmi Shukla not named as accused said state govt :

राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र:
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणातली एफआयआर रद्द करण्यात यावी, अशी याचिका हायकोर्टात केली होती. राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या उत्तरादाखल एक प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले. ‘तपासाचा उद्देश केवळ हे तपासणे आहे, की राज्य सरकारच्या गुप्तहेर खात्यातली संवेदनशील माहिती आणि दस्ताऐवज तिसऱ्या पार्टीला कसे काय मिळाले? तिसऱ्या पार्टीचा या दस्ताऐवजाशी काय संबंध आहे?’, असे या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने म्हटले.

दरम्यान, रश्मी शुक्लारश्मी शुक्ला यांनी एफआयआर रद्द करावी, असं आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. तसंच रश्मी शुक्ला यांनी असाही आरोप लावला आहे, की पोलीस दलातल्या बदल्या आणि भ्रष्टाचार समोर आणल्यामुळं महाराष्ट्र सरकार मला बळीचा बकरा बनवत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असं म्हटलं आहे, की पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. अशा वेळेस याचिकाकर्त्या रश्मी शुक्ला यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेला कोणताही आधार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Phone tapping case IPS Rashmi Shukla not named as accused said state govt.

हॅशटॅग्स

#RashmiShukla(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x