29 March 2024 8:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Health First | झोपेच्या गोळ्या घेताय? | ‘हे’ दुष्परिणाम देखील समजून घ्या - नक्की वाचा

Side effects of Sleeping pills

मुंबई, ०७ सप्टेंबर | जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप येत असेल, पण या झोपेच्या गोळ्यांचे बरेच साइड इफेक्ट्स देखील असतात जसे दिवसा सुस्ती येणे, रात्री वाईट स्वप्न दिसणे, डोके दुखी आणि लाल चकते येणे इत्यादी. या गोळ्यांचा वापर जर चुकीच्या पद्धतीने केला तर तुम्ही कोमात देखील जाऊ शकता किंवा तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन ने या आजारपणाला पब्लिक हेल्थ प्रॉब्लम म्हटले आहे. दुर्दैवाने या औषधांचे बरेच साइड इफेक्ट्स आहे म्हणून याचा वापर करण्याअगोदर यांच्याबद्दल जाणून घेणे फारच गरजेचे आहे की हे काम कसे करतात आणि याचा काय परिणाम होतो.

झोपेच्या गोळ्या घेताय?, ‘हे’ दुष्परिणाम देखील समजून घ्या – Side effects of Sleeping pills in Marathi :

स्लीपिंग पिल्स कशी काम करते?
दोन प्रकारच्या स्लीपिंग पिल्स असतात एक तर जी आधी वापरामध्ये होती जसे बेन्जोडायजेपाम ज्यात लॉरमेट्राजेपाम, डायजेपाम, निट्राजेपाम किंवा लोप्राजोलाम इत्यादी सामील आहे जी ब्रेनमध्ये झोपेला जागृत करणाऱ्या रिसेप्टरला टार्गेट करते पण याची तुम्हाला सवय लागते. तसेच नवीन प्रकारामध्ये स्लीपिंग पिल्स आधीच्या तुलनेत जास्त प्रभावकारी असते पण याचेही दुष्परिणाम आहेत.

स्लीपिंग पिल्सचे साइड इफेक्ट्स:
डॉक्टर स्लीपिंग पिल्सला घेण्यास नकार देतात जो पर्यंत रोग्याला गंभीर झोपेची समस्या होत नाही. तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की या स्लीपिंग पिल्सचा वापर केल्याने कोणते कोणते साइड इफेक्ट्स होऊ शकतात.

दिवसा सुस्ती येणे:
काही लोकांना या स्लीपिंग पिल्सचा वापर केल्याने दिवसाच सुस्ती येऊ लागते आणि काही लोकांना त्याच्याही दुसऱ्या दिवशी सुस्ती येते कारण हे औषध तुमच्या शरीरात जास्त वेळ आपला प्रभाव ठेवतो.

रात्री वाईट स्वप्न येणे:
जालेप्लोन, जोपिक्लोन आणि जोल्पिडेम इत्यादी असे औषध आहे ज्यांना 2 ते 4 आठवड्यासाठी दिले जाते. काही लोकांना या गोळ्यांमुळे वाईट स्वप्न येतात.

स्लीप एप्नियाला खराब करते:
जर तुम्हाला आधीपासूनच स्लीप एप्नियाचा त्रास असेल तर ह्या स्लीपिंग पिल्स याला अजून खराब करून देते. स्लीप एप्नियामध्ये तुम्हाला झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे तुम्ही पूर्णपणे झोप घेऊ शकत नाही आणि जास्त वेळ व्यक्ती जागाच राहतो.

ड्रगची सवय लागणे:
जर तुम्ही जास्त दिवसांपासून ह्या औषधांचा वापर करत असाल तर तुम्हाला या गोळ्यांची सवय लागते आणि याच्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही. या औषधांना तुम्ही अचानक सोडू देखील शकत नाही कारण याने देखील त्रास होतो जसे मळमळ, ओकारी आणि बेचैनी होऊ लागते.

Understanding the Side Effects of Sleeping Pills :

त्रास होणे:
मेलॅटोनिन आधारित झोपेच्या गोळ्या अनिद्रेला जास्त वाढवून देतात. याच्या सेवनामुळे तुम्हाला डोके दुखी, पाठ दुखी किंवा ज्वाइंट्समध्ये दुखायला लागते.

मृत्यूची शक्यता:
जर तुम्ही स्लीपिंग पिल्ससोबत इतर दुसरे ड्रग जसे वेदनाशामक औषधी किंवा कफ संबंधित औषध घेत असाल तर यामुळे तुम्हाला बरेच त्रास होण्याची शक्यता आहे जसे तुम्ही कोमात जाऊ शकता किंवा तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

वेडेपणा वाढू शकतो:
जर तुम्ही स्लीपिंग पिल्सला तीन महिन्यापेक्षा जास्त दिवसांसाठी वापर करत असाल तर तुम्हाला डोक्याशी निगडित अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. जसे तुम्हाला एलजीमर डिसीज होऊ शकतो ज्यात तुम्ही गोष्टी विसरू लागता.

हार्ट अटॅकचा धोका:
डॉक्टरांप्रमाणे झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका 50 टक्के वाढतो.
कॅन्सर: एका शोधात असे आढळून आले आहे की जे लोक रोज या गोळ्यांवर अवलंबून असतात. त्यांना कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. आता मात्र सावध व्हा आणि या गोळ्यांचे सेवन जाणीवपूर्वक टाळा. नैसर्गिक झोप येण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी योग्य आहार आणि योगासने यांची मदत घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Side effects of Sleeping pills in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x