17 April 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

भाजप खासदाराच्या कुटुंबाकडून सुनेचा छळ आणि मारहाण | मदतीच्या याचनेनंतरही चित्रा वाघ शांत?

Chitra Wagh

वर्धा, ०८ सप्टेंबर | वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.

भाजप खासदाराच्या कुटुंबाकडून सुनेचा छळ आणि मारहाण, मदतीच्या याचनेनंतरही चित्रा वाघ शांत? – BJP MP Ramdas Tadas daughter in law made serious allegations on family urges for help but no reaction from Chitra Wagh :

तडस कुटुंब मारहाण करत असल्याचा आरोप आहे. सुनेनं बनवलेला व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजाच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी ट्विटद्वारे दिली.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. हा केवळ 12 सेकंदांचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते”

मदतीसाठी याचना, पण चित्रा वाघ यांच्या शांत भूमिकेची चर्चा:
एका बाजूला एखाद्या महिलांसंबंधित विषयात राज्य सरकार अडचणीत येईल अशा विषयातच चित्रा वाघ लक्ष घालतात असा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहेत. तसेच त्या राजकीय हेतूने भूमिका ठरवतात असा देखील आरोप यापूर्वी झाला आहे. यापूर्वी अनेक भाजप नेते महिलांसंबंधित हल्ले आणि इतर प्रकरणात अडकले होते, मात्र त्यावेळी चित्रा वाघ यांनी त्यांच्या विरोधात कोणताही आक्रमक किंवा शिवराळ भाषेतील समाचार घेतल्याचं ज्ञात नाही असं समाज माध्यमांवर नेहमीच बोललं जातं. तसाच प्रकार पुन्हा तडस प्रकरणात पाहायला मिळतोय. राज्यातील महिलासंबंधित एखाद्या घटनेवर मन सुन्न करणारे व्हिडिओ रेकॉर्ड करायला क्षणाचाही विलंब न लावणाऱ्या चित्रा वाघ यांचं मन सध्या या मुद्यावर सुन्न झाल्याचं पाहायला मिळत नसल्याने अनेकांनी समाज माध्यमांवर चर्चा सुरु केली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी समाज माध्यमांवर मत व्यक्त करताना चित्रा वाघ यांनी भाजप खासदार रामदास तडस यांच्या घरी मोर्चा काढून त्यांना अद्दल घडवावी अशी भुमीका घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी चित्रा वाघ काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MP Ramdas Tadas daughter in law made serious allegations on family urges for help but no reaction from Chitra Wagh.

हॅशटॅग्स

#ChitraWagh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x