25 April 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

व्हिडिओ व्हायरल: फसलेल्या नोटबंदीची राज ठाकरेंकडून पोलखोल, आरबीआय'चा अहवाल ते तत्पूर्वीचा घटनाक्रम केला प्रसिद्ध

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फसलेल्या नोटबंदीवरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यासाठी त्यांनी आरबीआय’चा अहवाल ते तत्पूर्वीच्या घटनाक्रमाचा संपूर्ण माहितीपटच व्हिडीओ’द्वारे प्रसिद्ध केला आहे. देशभरातील सव्वाशे कोटी जनतेला याचा फटका बसला होता आणि यात बँकेच्या रांगेत अनेक निष्पापांचा जीव सुद्धा गेला होता. तसेच देशभर बँकांच्या आणि एटीएम’च्या बाहेर रांगेत उभं राहून हक्काच्या पैशासाठी पोलिसांचा लाठीमार सुद्धा सहन करावा लागला होता.

परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला आणि त्यात नोटबंदीनंतर ९९.३३ म्हणजे जवळजवळ सर्वच नोटा बँकेत परत आल्या होत्या आणि तिथेच नोटबंदी फसल्याचे अधिकृत पणे उघड झाले होते. परंतु सामान्यांच्या डोळयात अंजन भरण्यासाठी आणि फसलेल्या नोटबंदीचे वास्तव सामान्यांना समजावे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या नोटबंदीची पोलखोल करणारा संपूर्ण व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

मुख्य म्हणजे नरेंद्र मोदींनी नोटबंदी ९ नोव्हेंबर २०१६ रोजी घोषित केली आणि त्याच्या अवघ्या तिसऱ्या दिवशीच राज ठाकरे यांनी नोटबंदी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे विधान केले होते. त्यावेळी त्यांच्यावर टीकासुद्धा झाली होती, कारण मोदींच्या भाषणाने सर्व नागरिकांच्या डोळ्यावर ‘नोटबंदीचा त्रास सहन करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी देशाचे सैनिक व्हा’ या भावनिक आवाहनाची झापड पडली होती, जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत अहवालाने उठवली. तेव्हा मोदी तोंडघशी पडले आणि राज ठाकरे यांचं ते विधान अभ्यासपूर्वक असल्याचं सिद्ध झालं.

तरी सामन्यांना या संपूर्ण फसलेल्या नोटबंदीच वास्तव पटवून देण्यासाठी आणि मोदींच्या फसलेल्या नोटबंदीचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी एका व्हिडिओ’द्वारे प्रसिद्ध केला आहे.

काय आहे तो नेमका व्हिडिओ?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x