18 April 2024 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

OBC Reservation | मुख्यमंत्री स्तरावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल - जयंत पाटील

OBC Reservation

सांगली , १२ सप्टेंबर | राज्यातील ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत आरक्षणाच्या बाबतीत निर्णय़ होईल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसी आरक्षण कमी होता कामा नये, ही सरकारची भूमिका असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ते सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे बोलत होते.

OBC Reservation, मुख्यमंत्री स्तरावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल – All party leaders will discuss in meeting with Chief Minister over OBC reservation says minister Jayant Patil :

ओबीसी आरक्षण बाबत पुन्हा सर्वपक्षीय बैठक:
राज्यातील ओबीसी आरक्षण बाबतीत सरकारने पुढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठक घेत तातडीने कमी कालावधीत ओबीसी जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे त्या टक्केवारीनुसार आरक्षण देता येईल का? हे ठरणार होते. पण आता ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे, त्या ठिकाणी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहेत, त्याबाबतीत सर्व अधिकार राज्य न निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर भाष्य करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित बसून कोणता मार्ग काढला पाहिजे, तो काढायला हवा. शेवटी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण रद्द झाले नाही पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा सर्वपक्षीय बैठक घेतली, यामध्ये काय मार्ग काढायचा याबाबतीत साधक बाधक चर्चा होईल,असेही मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

हा तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न:
तर किरीट सोमय्या हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार असल्याचे म्हणाले होते, यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली. छगन भुजबळ यांच्यावर आरोप खोटे होते, अनिल देशमुख यांच्यावरच आरोप देखील खोटे निघाले आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून महाराष्ट्राची जनता याची नोंद घेईल, असे मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: All party leaders will discuss in meeting with Chief Minister over OBC reservation says minister Jayant Patil.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x