25 April 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

Rain Updates | IMD कडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update

मुंबई , १२ सप्टेंबर | भारतीय हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे.

Rain Updates, IMD कडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा – IMD issued new rain alert for Maharashtra :

येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.त सेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम होऊन पश्चिम किनारपट्टीवर पुढचे तीन ते चार दिवस वेगवान वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर, राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

राज्यातील आजची पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागानं आजसाठी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदियाला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: IMD issued new rain alert for Maharashtra.

हॅशटॅग्स

#RainUpdates(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x