19 April 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

OBC Reservation | ओबीसी नेतृत्व संपुष्टात आणण्याचे पाप भाजपाचे | सत्तेत असताना झोपा काढल्या, आता आंदोलन - नाना पटोले

OBC Reservation

मुंबई, १५ सप्टेंबर | राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

OBC Reservation, ओबीसी नेतृत्व संपुष्टात आणण्याचे पाप भाजपाचे, सत्तेत असताना झोपा काढल्या, आता आंदोलन – नाना पटोले – Congress state president Nana Patole criticized BJP over agitation for OBC reservation :

ओबीसी आरक्षणाचा पेच:
ओबीसींचे राजकीय आरक्षण नियमित होत नाही, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी अशी भूमिका राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतली. मात्र निवडणुका घ्याव्यात किंवा घेऊ नयेत याबाबत केवळ निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकते. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर राज्य सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत. धुळे, अकोला, नंदुरबार, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यातील नगरपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची? याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केले जातं आहे.

दरम्यान, भाजपच्या या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच ओबीसींच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यामुळे भाजपने या दोघांविरोधात आधी आंदोलन करावे. राज्य सरकार विरोधातील आंदोलनाची नौटंकी बंद करावी, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी चढवला आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी असतानाही ती माहिती राज्य सरकारांना देत नाही. सुप्रीम कोर्टानेही ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान ओबीसींचा इम्पीरिकल डेटा मागितला असता केंद्र सरकारने ते देण्याचे जाणीवपूर्वक टाळले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणात मोदी सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढेच फडणवीस सरकारही जबाबदार आहे. 2017 साली नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक फडणवीस यांनी एक परिपत्रक काढून पुढे ढकलली. नंतर इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या, यातून गुंता वाढत गेला आणि परिणामी आरक्षण धोक्यात आले, असा दावा पटोले यांनी केला आहे.

भाजपाच्या बेजबाबदारपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात आले असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील जवळपास 55 ते 56 हजार जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. ओबीसी समाजातील नेतृत्व संपुष्टात आणण्याचे पाप भाजपाने केले आहे. पाच वर्ष सत्तेत असताना फडणवीसांनी झोपा काढल्या आणि आता आंदोलन करून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. भाजपाला जर ओबीसी समाजाचा खराच कळवळा असता तर ही वेळच येऊ दिली नसती. त्यांचे षडयंत्र उघडे पडल्यामुळे आपल्यालाच ओबीसी समाजाच्या हिताची चिंता असल्याचे भासवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Congress state president Nana Patole criticized BJP over agitation for OBC reservation.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x