25 April 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

Bridge Collapse in Mumbai | मुंबई वांद्रे कुर्ला येथे पहाटे उड्डाणपुलाचा एक गर्डर निखळून खाली पडला | 14 कामगार जखमी

Bridge collapse in Mumbai BKC

मुंबई, १७ सप्टेंबर | वांद्रे कुर्ला येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला आहे. यामध्ये 14 कामगार जखमी झाले आहेत. यातील जखमी सर्वांना बीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आणि बचावकार्य सुरू आहे.

मुंबई वांद्रे कुर्ला येथे पहाटे उड्डाणपुलाचा एक गर्डर निखळून खाली पडला, 14 कामगार जखमी – Collapse in Mumbai BKC area :

कामगाराचा मृत्यू झाला नाही:
हा उड्डाणपूल मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात बांधला जात होता. त्याचा एक भाग शुक्रवारी सकाळी 4:40 च्या सुमारास पडला. या अपघातात 14 मजूर जखमी झाले आहेत. डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, अपघातात कोणीही बेपत्ता नाही. तसेच, कोणत्याही कामगाराचा मृत्यू झाला नाही. हा अपघात कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे असही ते म्हणाले आहेत.

पहाटेच्या वेळी काम सुरू असताना या पूलाचा एक गर्डर निखळून खाली पडायला सुरुवात झाली. पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्वजण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले आहेत. या मजूरांच्या दुखापतीचे स्वरुपत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले. त्यांनी जखमींना नाल्यातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तुर्तास तरी कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही. हा उड्डाणपूल कसा पडला, याचे कारणही अद्याप समजलेले नाही. मात्र, यावरुन आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Bridge collapse in Mumbai BKC area.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x