29 March 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

ED Vs Anil Deshmukh | ED'कडून भ्रष्टाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल | अनिल देशमुखांचं नाव वगळलं?

Anil Deshmukh

मुंबई, १७ सप्टेंबर | मनी लॉड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळाले. ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित मालमत्तांवर छापेही टाकले. ईडीने अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.

ED Vs Anil Deshmukh, ED’कडून भ्रष्टाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल, अनिल देशमुखांचं नाव वगळलं? – ED not included Anil Deshmukh’s name in Charge sheet in money laundering case :

आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती:
अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नाव नसल्याची माहिती समोर येत असून, अनिल देशमुखांची अद्याप चौकशीच झालेली नसल्याचे कारण ईडीकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासह अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे.दरम्यान, अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.

तपास पूर्ण केल्यानंतर पूरक आरोपपत्र दाखल केले जाईल:
ईडीने न्यायालयाला सांगितले की, ते अनिल देशमुख आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात चौकशी करत आहेत. तपास पूर्ण केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करेल. ईडीने न्यायालयाला सांगितले की, अनिल देशमुख ईडीचे समन्स कित्येक महिन्यांपासून टाळत आहेत आणि त्यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

पाचही वेळा देशमुख ईडीसमोर आले नाहीत:
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: ED not included Anil Deshmukh’s name in Charge sheet in money laundering case.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x