23 April 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध | कोल्हापुरात नो एन्ट्री | घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त

Kirit Somiya

मुंबई, १९ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय.

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री, घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त – BJP leader Kirit Somaiya has been detained by Police denied entry in Kolhapur district :

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मी उद्धव ठाकरे यांना चॅलेन्ज देतो. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

फडणवीसांची प्रतिक्रिया:
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं ठणकाऊन सांगितलंय.

दरेकरांची प्रतिक्रिया:
भाजप नेते किरीट सोमैया हे मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा बाहेर काढणार होते. त्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते म्हणून सोमैया यांना घरातून बाहेर पडू दिले जात नाही. गृहमंत्र्यांनी सोमैया यांच्या घरी पोलीस पाठवले आहे आघाडी सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: BJP leader Kirit Somaiya has been detained by Police denied entry in Kolhapur district.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x